एक्स्प्रेस वे अन् हायवेवर ड्रायव्हिंगचे नियम बदलणार! दर १० किमीवर मिळणार ही सुविधा, जाणून घ्या नवा नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 17:09 IST2025-01-02T17:07:54+5:302025-01-02T17:09:14+5:30
NHAI ने एक्स्प्रेस वे आणि नॅशनल हायवेबाबत नवा नियम बनवला आहे. या नियमांतर्गत प्रत्येक १० किमी अंतरावर फलक लावले जातील.

एक्स्प्रेस वे अन् हायवेवर ड्रायव्हिंगचे नियम बदलणार! दर १० किमीवर मिळणार ही सुविधा, जाणून घ्या नवा नियम
देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पण, देशात अपघातही वाढले आहेत. याबाबत चिंता व्यक्त करत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्ते अपघातांना आळा बसणार आहे. यामुळे होणारे अपघात टाळता येऊव शकतात. या नव्या नियमानुसार दर १० किलोमीटरवर मोठे फलक लावण्यात येणार आहेत.
भाजपा आमदारावर गोळीबार, पत्नीसोबत नाईट वॉक करत असताना झाडल्या गोळ्या
फेब्रुवारी २०२५ पासून लागू होणाऱ्या नियमानुसार द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर फलक लावले जातील. केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे की, सुरक्षित वाहन चालविण्यासाठी रस्त्यावरील चिन्हे आणि चिन्हे अत्यंत महत्त्वाची आहेत. प्रत्येक वाहनचालकाला रस्त्याची भाषा अवगत असावी. या कारणास्तव, रस्ते वाहतूक मंत्रालयाने रस्त्यांच्या मालकीच्या कंपन्यांसाठी नियम जारी केले आहेत यात प्रत्येक १० किमी अंतरावर फूटपाथवर वाहनांच्या वेगाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
एनएचएआयने यासंदर्भात सांगितले आहे की, वाहनांची स्पीड लिमिट प्रत्येक ५ किमीवर लिहावी लागेल. यासोबतच महामार्ग आणि एक्स्प्रेस वेच्या मालकीच्या कंपन्यांना वाहनचालकांना सूचना देण्यासाठी दर ५ किमीवर नो पार्किंगचे संकेत बसवावे लागतील. प्रत्येक ५ किमी अंतरावर आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक लिहावा लागेल, असेही या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे.
राष्ट्रीय महामार्गांवर गुरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित करण्यासाठी NHAI ने निर्णय घेतला आहे. त्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर प्राण्यांसाठी निवारे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे रस्ते अपघात तर कमी होतीलच शिवाय प्राण्यांच्या सुरक्षिततेचीही खात्री होईल. या प्रकल्पांतर्गत जनावरांसाठी चारा आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच जखमी जनावरांवरही उपचार केले जाणार आहेत.