भारतीय लायसन्समुळे ९ देशांत चालवता येते वाहन; अमेरिकेसह फ्रान्स, इंग्लंडचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 02:28 AM2018-10-09T02:28:50+5:302018-10-09T02:29:52+5:30
अनेकदा आपल्याकडे ड्रायव्हिंगचे लायसन्स असते; पण परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते, असे आपणास सांगण्यात येते; पण भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारे तुम्ही जगातील तब्बल ९ देशांमध्ये तीन महिने ते एक वर्षापर्यंत वाहन चालवू शकता.
नवी दिल्ली : अनेकदा आपल्याकडे ड्रायव्हिंगचे लायसन्स असते; पण परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते, असे आपणास सांगण्यात येते; पण भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारे तुम्ही जगातील तब्बल ९ देशांमध्ये तीन महिने ते एक वर्षापर्यंत वाहन चालवू शकता. अर्थात अनेक देशांत वाहने उजवीकडून चालवतात, तर आपल्याकडे डाव्या बाजूने. त्यामुळे ही नवी शिस्त तिथे शिकावीच लागते.
अनेक देशांत वाहने भाड्याने मिळतात. त्यापैकी ९ देशांत तुमच्याकडे लायसन्स असल्यास तुम्ही वाहन भाड्याने घेऊ न त्या देशाच्या कोणत्याही भागात ते चालवू शकतात. अगदी अमेरिकेतही तुम्हाला एक वर्ष वाहन चालवण्यासाठी परवानगी आहे; पण अट एकच, तुमचे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीतील असायला हवे. शिवाय ते लायसन्स असले तरी तुम्हाला आय-९४ फॉर्म सोबत ठेवावा लागतो. त्यावर तुम्ही अमेरिकेत कधी आलात, याचा उल्लेख असतो. अर्थात या सर्व ९ देशांत केवळ इंग्रजीतील भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स चालते. त्यावर तुमचे छायाचित्र असणेही अनिवार्य आहे. तसेच वाहन भाड्याने घेताना तुमच्याकडे लायसन्स आहे का, हे पाहिले जाते. प्रादेशिक भाषेत छापलेले वा त्यावर प्र्रादेशिक भाषेत तुमचा नाव, पत्ता आदी माहिती असेल, तर ते तिथे ग्राह्य धरले जात नाही. जर्मनीमध्ये तुम्ही सहा महिने वाहन चालवू शकता, तर स्वीत्झर्लंडमध्ये एक वर्ष तशी परवानगी आहे. दक्षिण आफ्रिकेमध्येही भारतातील ड्रायव्हिंग लायसन्सआधारे १ वर्ष चारचाकी वाहन चालविण्याची परवानगी देण्यात आली. नॉर्वे, आॅस्ट्रेलिया या दोन देशांत भारतीय लायसन्स असेल, तर केवळ तीनच महिने वाहन चालवण्याची परवानगी दिली जाते.
...तर आंतरराष्ट्रीय लायसन्स आवश्यक
या सर्व देशांत ठरलेल्या मुदतीपेक्षा अधिक काळ वाहन चालवायचे असेल, तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स घ्यावेच लागते. अन्यथा अर्थात परदेशांत स्थायिक झालेले तसेच शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी तिथे जाताच लगेच आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेतात.