ड्रोन वापरता? 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 11:17 AM2020-01-14T11:17:52+5:302020-01-14T11:28:33+5:30

ड्रोनची नोंदणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

drone owners will have to register their drones by 31st january | ड्रोन वापरता? 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; अन्यथा...

ड्रोन वापरता? 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; अन्यथा...

Next
ठळक मुद्देड्रोनची नोंदणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण नोंदणी न केल्यास तुरुंगवारी होऊ शकते. ड्रोन असणाऱ्या सर्व व्यक्तींना 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.14 जानेवारीपासून ड्रोनची नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

नवी दिल्ली - वाढदिवस, साखरपुडा, लग्नसोहळा, शोभायात्रा, सण-समारंभ अथवा इतर खासगी कार्यक्रमासाठी हल्ली ड्रोन कॅमेऱ्याचा हमखास वापर केला जातो. ड्रोनच्या मदतीने फोटो आणि व्हिडीओ घेऊन अप्रतिम शूट करण्याच्या सध्याचा ट्रेंड आहे. मात्र यासाठी परवानगी घेणं गरजेचं असतं. ड्रोनची नोंदणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण नोंदणी न केल्यास तुरुंगवारी होऊ शकते. ड्रोन असणाऱ्या सर्व व्यक्तींना 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत सूचना दिल्या आहेत. 

ड्रोन संदर्भातील नियमांचे उल्लंघन केलं आणि 31 जानेवारीपर्यंत नोंदणी केली नाही तर संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 14 जानेवारीपासून ड्रोनची नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. अमेरिकेने इराणवर ड्रोन हल्ला केल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे. मंत्रालयाकडून यासंदर्भात एक परिपत्रकही काढण्यात आले आहे. ड्रोन जवळ बाळगणारी व्यक्ती किंवा संचालक आहेत त्यांच्याकडून नागरी हवाई नियमावलीचं पालन केलं जात नसल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे. 

ड्रोन उडवणाऱ्या व्यक्ती आणि संचालकांना स्वतः हून त्याची माहिती जाहीर करण्याची संधी देण्यात येत आहे. ड्रोन बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 31 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याची माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे. ऑगस्ट 2018 मध्ये ड्रोनच्या वापरासंदर्भात सीएआर लागू करण्यात आला आहे. 

प्रत्येक ड्रोनसाठी एक युनिक आयडेंटीफिकेशन क्रमांक दिला जातो. याशिवाय परमिट आणि अन्य मंजुरीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. परवानगीशिवाय ड्रोन उडवणं बेकायदेशीर आहे. 31 जानेवारीपर्यंत जे ड्रोनचे मालक स्वतः हून घोषणा करतील त्यांच्या ड्रोनसाठी यूनिक आयडी दिले जाणार आहे. हे दोन्ही क्रमांक ड्रोन उड्डाण किंवा ते बाळगण्याचे अधिकार देतील. ड्रोनची नोंदणी करण्यासाठी https://digitalsky.dgca.gov.in/ यावर लॉगिन करावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या 

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात

दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा, योगगुरू रामदेव बाबांचा सल्ला

Delhi Elections : 'आप' विरोधात भाजपाचा 500 कोटींचा दावा

'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना- शिवसेना

मोदी-शाह-डोवालांच्या फोटोंवर क्रॉस, प्रज्ञा सिंह ठाकूरांना मिळाले संशयित पत्र

 

Web Title: drone owners will have to register their drones by 31st january

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत