जम्मूमध्ये तीन दिवसात दुसऱ्यांदा दिसले संशयित ड्रोन, मागच्याच महिन्यात झाला होता ड्रोन हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:08 PM2021-07-15T12:08:36+5:302021-07-15T12:09:18+5:30

Drone Spotted Near Jammu Air Force Station: 26 जूनच्या रात्री जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता.

Drone Spotted Near Jammu Air Force Station | जम्मूमध्ये तीन दिवसात दुसऱ्यांदा दिसले संशयित ड्रोन, मागच्याच महिन्यात झाला होता ड्रोन हल्ला

जम्मूमध्ये तीन दिवसात दुसऱ्यांदा दिसले संशयित ड्रोन, मागच्याच महिन्यात झाला होता ड्रोन हल्ला

Next
ठळक मुद्देमागच्या काही आठवड्यांपासून जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांमध्ये ड्रोन अॅक्टिव्हीटीज पाहायला मिळत आहेत

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनच्या संशयास्पद कारवाया वाढल्या आहेत. बुधवारी रात्री जम्मूतील एअर फोर्स स्टेशनजवळ एक संशयित ड्रोन दिसून आला.  जम्मू-काश्मीरमध्ये संशयित फ्लाइंट ऑब्जेक्ट दिसण्याची ही मागील दोन दिवसातील दुसरी घटना आहे. यापूर्वी, मंगळवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर एक उडणारी वस्तु दिसली होती.

बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, अरनिया सेक्टरमध्ये 14 जुलैच्या रात्री 9.52 वाजता 200 मीटर उंचीवर एक लाल लाइट असलेली उडती वस्तु दिसली होती. जवानांनी त्यावर फायरिंग सुरू केली. पण, वस्तुला गोळी लागली नाही आणि ती माघारी परतली. मागच्या काही आठवड्यांपासून जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांमध्ये ड्रोन अॅक्टिव्हीटीज पाहायला मिळत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने श्रीनगर, कुपवारा, राजौरी आणि बारामूलामध्ये ड्रोन उड्डाणांवर बंदी लावण्यात आली आहे.

जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता
26 जूनच्या रात्री जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता. त्यात दोन जवान किरकोळ जखमी झाले होते. 5 मिनीटांच्या अंतराने दोन ब्लास्ट झाले. यावळी ड्रोनद्वारे एअरफोर्स स्टेशनवर दोन IED टाकण्यात आले. जम्मू-काश्मीरचे DGP दिलबाग सिंह यांनी त्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले होते.

Web Title: Drone Spotted Near Jammu Air Force Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.