बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 07:06 AM2024-10-02T07:06:44+5:302024-10-02T07:07:16+5:30

भात कलान भागातील एका मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केल्यानंतर दोन व्यक्ती रडताना दिसल्या. 

Drop the gun, come back home! An emotional appeal by Dain militants' fathers after the vote jammu kashmir | बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन

बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन

- सुरेश एस. डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क
जम्मू : काश्मिरातील सफरचंदाचे शहर असलेल्या सुपर मध्ये आज उत्सवाचा माहोल होता. कारण एका दशकानंतर तेथे विधानसभेसाठी मतदान होत होते. भात कलान भागातील एका मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केल्यानंतर दोन व्यक्ती रडताना दिसल्या. 

गुलाम हसन मीर यांचा मुलगा उमर काही वर्षांपूर्वी दहशतवादी झाला. डबडबलेल्या डोळ्यांनी ते म्हणाले, मी माझ्या त्या मुलाला घरी परत येण्याचे आणि कुटुंबासोबत शांततापूर्ण जीवन जगण्याचे आवाहन करतो. मतांमुळे जे प्राप्त करता येते ते बंदुकांमुळे प्राप्त करता येत नाही. 

दुसरी व्यक्ती हमजा म्हणाले, जर मतदान माझ्या मुलाला परत आणत असेल तर मी ही संधी कधीही सोडणार नाही. माझ्या मुलाचे नाव बिलाल आहे. तो चुकीच्या मार्गाला लागला आहे. त्याने घरी परत यावे. 

जम्मू काश्मिरात अंतिम टप्प्यात ६८.७२% मतदान
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यात 
४० जागांसाठी ६८.७२% मतदान झाले. 
३७० कलम रद्द केल्यानंतर झालेली पहिली निवडणूक तुरळक प्रकार वगळता शांततेत पार पडली. ८ ऑक्टाेबरला निकाल येतील.

तीन टप्प्यांतील मतदान
दिनांक     टप्पा      जागा      मतदान
१८ सप्टेंबर     पहिला     २४     ६१.३८%
२५ सप्टेंबर     दुसरा     २६     ५७.३१%
१ ऑक्टोबर    तिसरा     ४०     ६८.७२%

Web Title: Drop the gun, come back home! An emotional appeal by Dain militants' fathers after the vote jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.