थेंब आभाळी न येतो पूर भीमेसी न येतो

By admin | Published: April 4, 2015 11:34 PM2015-04-04T23:34:14+5:302015-04-04T23:34:14+5:30

केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील कवी-कवयित्रींच्या काव्यसंमेलनात वेगवेगळ्या काव्यरंगांची उधळण झाली.

The drops do not come with flowing water | थेंब आभाळी न येतो पूर भीमेसी न येतो

थेंब आभाळी न येतो पूर भीमेसी न येतो

Next

संमेलनात उमटल्या पंजाबी, मराठी शेतकऱ्यांच्या व्यथा
प्रतिनिधी ल्ल घुमान (संत नामदेवनगरी)
केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील कवी-कवयित्रींच्या काव्यसंमेलनात वेगवेगळ्या काव्यरंगांची उधळण झाली. या काव्यसंमेलनात पंजाबी, मराठी, हिंदी अशा निरनिराळ्या भाषांतील काव्य सादर झाले.
८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या श्री गुरुनानक देवजी सभामंडपात निमंत्रितांचे काव्य संमेलन पार पडले. काव्याचा आस्वाद घेण्यासाठी या संमेलनालाही साहित्यप्रेमींनी गर्दी केली. या संमेलनात ‘दु:ख येतेच’ ही कवी संदीप खरे यांची कविता वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या कवितेत ‘सुखाचा शेवटचा क्षण जप्त केल्याशिवाय, व्यापू शकत नाही दु:ख’ असे म्हणत संदीप खरेंनी उपस्थितांची दाद मिळवली.
या संमेलनात संगीता धायगुडे यांनी बलात्कार झालेल्या मुलीची व्यथा आपल्या कवितेतून सादर करीत रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. तर नाशिकच्या नंदन रहाणे यांनी विठ्ठलावर आधारित गवळण सादर केली. नांदेडच्या देविदास फुलारी यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळलकर यांच्या हत्येबाबतची उदासीनता आपल्या कवितेतून सादर केली. ‘उजेडाच्या शोधात’ या शीर्षकांतर्गत कवितेतून समाजातील पुरोगामी विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
थेंब आभाळी न येतो, पूर भीमेसी न येतो या कवितेला रसिकांची विशेष दाद मिळाली़ पंजाबी व मराठी शेतकऱ्यांचे दु:ख अनेक कवींनी मांडले़

४मध्य प्रदेश येथील भोपाळहून आलेल्या आरती कानिटकरांनी ‘आपुलकीने बोलू’ हे काव्य
सादर केले. रोजच्या जीवनातील संवाद आणि संभाषणामधील हरवलेल्या आपुलकीच्या नात्याबद्दलचे चित्रण कवितेत मांडण्यात आले. मराठी ही मातृभाषा आणि हिंदी माध्यमात शिक्षण झालेल्या ही कवयित्री आजही भोपाळमध्ये मराठी भाषा टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे.

Web Title: The drops do not come with flowing water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.