चांदवड तालुका मनसेच्यावतीने प्रांताधिकार्‍यांना दुष्काळ व विविध प्रश्नी निवेदन

By Admin | Published: May 21, 2016 11:48 PM2016-05-21T23:48:11+5:302016-05-23T00:19:56+5:30

Drought and various questionnaires are requested by the Chandwad taluka MNS for the provincial authorities | चांदवड तालुका मनसेच्यावतीने प्रांताधिकार्‍यांना दुष्काळ व विविध प्रश्नी निवेदन

चांदवड तालुका मनसेच्यावतीने प्रांताधिकार्‍यांना दुष्काळ व विविध प्रश्नी निवेदन

googlenewsNext


चांदवड - चांदवड - देवळा तालुक्यातील दुष्काळ व विविध प्रश्नाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेे राज्य सचिव प्रमोद पाटील, मनसेचे सरचिटणीस ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष शशीकांत जाधव, जिल्हाउपाध्यक्ष डॉ. नवलकिशोर शिंदे , तालुकाध्यक्ष संपत बाबा वक्टे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी भीमराज दराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, चांदवड - देवळा तालुका परपरांगत दुष्काळी तालुके असून आघाडी व युती शासनाने या दोन्ही तालुक्यासाठी काहीच केले नाही. स्व. माजी आमदार जयचंद कासलीवाल यांच्या काळात ४४ गाव नळपाणी पुरवठा योजना सुरु करुन दिली मात्र या योजनेवर आता बरीच गावे वाढली मात्र त्यांना १५-१५ दिवस पाणीपुरवठा होत नाही. यावर्षी सन १९७२ पेक्षा कठीण दुष्काळ पडलेला आहे. प्यायला पाणी नाही. त्यातच भारनियमन, चार्‍याचे दुर्भीक्ष, हातात असल्या नसल्या कांद्याला भाव नाही. यामुळे शेतकरी देशो धडीला लागला आहे. त्यात बॅकाकडून सक्तीची कर्ज वसुली यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत याकरिता शासनाने संपुर्ण कर्जमाफी करावी, शेतकर्‍यांना तात्काळ बी- बीयाण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन द्यावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, शासनाने घोषणा केल्याप्रमाणे हमी भाव देऊन शेतकर्‍यांचा कांदा खरेदी करावा, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दुष्काळ जाहीर करावा, नवीन जलसिंचनाचे कामे हाती घेऊन ती पुर्ण करावीत ,जी चालु कामे आहेत ती राजकीय सुड बाजुला ठेऊन त्या कामांना प्राधान्यक्रमाने पुर्ण करावीत, तसेच देवळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुविधा नाहीत. त्यांना उच्च शिक्षणासाठी नाशिक येथे जावे लागते यामुळे त्यांच्या पैशाचा व वेळेचा अपव्यय होतो त्याकडे लक्ष द्यावे, चांदवड व देवळा येथे अद्यावत बसस्थानक नसल्यामुळे दिवसा व रात्री लांब पल्यांच्या बसेस बासपासने निघुन जातात याकडे लक्ष द्यावे, चांदवड व देवळा तालुक्याचे प्रशासकीय कार्यालय शहरापासून ३ किमी अंतरावर असल्याने साधी झेरॉक्स काढण्यासाठी गावात जावे लागते. चांदवड येथील प्रशासकीय कार्यालयात मुलभुत सुविधा नाही. कार्यालयात ५० हुन अधिक कर्मचारी असूनही व दररोज शेकडो नागरीक शासकीय कामासाठी येत असतात. त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. इमारतीत क पाण्याअभावी स्वच्छता गृह बंद आहे. तर महिला व महिला कर्मचारी यांची कुचंबणा होत आहे. शेती ही पावसावर अवलंबुन असल्यामुळे पुरक धंदे व व्यवसाय उपलब्ध नाही. मतदार संघाचे आमदार व खासदार यांचे तोंड बघण्यासाठी नाशिकला सर्व सामान्य नागरीकांना जावे लागते. त्यामुळे दोघांचा जनसंपर्क तालुक्याशी नाही. नागरीकांनी निवडणुका झाल्यानंतर दोघांचे मुखदर्शन अजुनही न झाल्याचा दावा केलेला आहे. खेड्या पाड्यावर रस्ते, पाणी, वीज या मुलभुत सुविधा नसल्यामुळे स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे. अद्यावत बाजारपेठ नसल्याने शेतकरी लासलगाव , पिंपळगाव, नाशिकला माल घेऊन जात असल्याने त्याच्या वेळेचा व पैशांचा दुरउपयोग होत आहे. तर चादंवड शहरात महामार्गावर असलेली चौफुली तर अधिकच धोकादायक बनलेली आहे. नेहमीच वर्दळ असल्यामुळे नेहमीच अपघात होतात. येथील सिग्नल यंत्रणा चार वर्षापासून बंद आहे. ते त्वरीत चालु करावेत चांदवड नगरपरिषद असूनही शहरात एकही जलशुध्दीकरण केंद्र व लहान मुलासाठी उद्यान नाही. मतदार संघात एकही सरकारी औद्योगीक वसाहत नाही. वसाहत झाल्यास तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटेल पोल्ट्री व्यवसायात २००१ योजनेप्रमाणे ३० टक्के सबसिडी मिळावी, चांदवड तालुका डी प्लस च्या वर्गवारीमध्ये असल्याने शासकीय सबसिडी, व्डॅट सबसिडी मिळते परंतु अखंडीत वीजेचा पुरवठा नसल्याने उद्योजकांना उद्योग उभारणीस फारच अडचण येते या सर्व बाबीचा विचार शासनाने करावा अन्यथा मनसे मुंबई आग्रारोडवर उतरुन आंदोलन करेन असा इशारा निवेदनात दिला आहे निवेदनाच्या प्रती तहसीलदार माणिक अहेर , गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे यांना दिल्यात यावेळी मनसेचे परवेज पठाण, नितीन थोरे, किशोर चौबे, गोरख हिरे, दिंगबर राऊत, खंडेराव घुले, अविनाश ठाकरे व चांदवड तालुक्यातील मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. ( वार्ताहर)चांदवडचे प्रांताधिकारी भीमराज दराडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चांदवड व देवळा तालुक्यातील दुष्काळ व विविध प्रश्न निवेदन देतांना राज्य सचिव प्रमोद पाटील,जिल्हाध्यक्ष शशीकांत जाधव,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नवलकिशोर शिंदे, ॲड. रतनकुमार इचम,तालुकाप्रमुख संपतबाबा वक्टे, परवेज पठाण, किशोर चौबे मनसे कार्यकर्ते

Web Title: Drought and various questionnaires are requested by the Chandwad taluka MNS for the provincial authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.