‘साईबाबांच्या पूजेमुळे राज्यात दुष्काळ’
By admin | Published: April 12, 2016 02:48 AM2016-04-12T02:48:01+5:302016-04-12T02:48:01+5:30
साईबाबा हे देव नव्हे तर फकीर होते. ते अशुभ होते. अपात्र देवांची पूजा केल्यामुळे संकट कोसळते. महाराष्ट्रातील दुष्काळ त्याचेच कारण आहे, असे आणखी एक वादग्रस्त विधान
नवी दिल्ली : साईबाबा हे देव नव्हे तर फकीर होते. ते अशुभ होते. अपात्र देवांची पूजा केल्यामुळे संकट कोसळते. महाराष्ट्रातील दुष्काळ त्याचेच कारण आहे, असे आणखी एक वादग्रस्त विधान द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे.
शनी हा पापग्रह असून त्याची पूजा केल्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढतात, असेही ते म्हणाले. शंकराचार्य हे १५ दिवसांच्या हरिद्वारभेटीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांना ही प्रतिक्रिया दिली. अपात्र देवांची पूजा केल्यामुळे संकटे उद्भवतात. अशा ठिकाणी दुष्काळ, पूर, मृत्यू आणि भय सतावत असते. महाराष्ट्राला या सर्व पीडा सोसाव्या लागत आहे, असे ते म्हणाले.यापूर्वीही त्यांनी साईपूजेला उघड उघड विरोध केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महिलांना प्रवेश नकोच...
९४ वर्षीय शंकराचार्यांनी शनी शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याचा विरोध केला आहे. शनी हा पापग्रह असून महिलांनी त्याची पूजा केल्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढतील, असेही त्यांनी म्हटले.