दुष्काळ; जागतिक बँक-फडणवीस
By Admin | Published: April 26, 2016 01:59 AM2016-04-26T01:59:09+5:302016-04-26T01:59:09+5:30
दुष्काळ निवारणासाठी जागतिक बँकेला साकडेमुख्यमंत्री : ५ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव सादरमुंबई : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ...
>दुष्काळ निवारणासाठी जागतिक बँकेला साकडेमुख्यमंत्री : ५ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव सादरमुंबई : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेकडून ५ हजार कोटींचे कर्ज मागितले असून तसा प्रस्तावही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळाने होरपळणार्या मराठवाड्यातील ३ हजार गावे आणि विदर्भातील २ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यास मोठी मदत होईल. तसेच जलसंवर्धनाच्या कामावरही भर देता येईल. त्यानंतर दुष्काळी भागासाठी पीकपद्धत बदलण्याचा निर्णय घेतला जाईल. ही योजना मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद तसेच विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात राबविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.जलसंवर्धन ते पीक पद्धतीत बदल करणे, यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून दुष्काळाचे निवारण करण्यासाठी जागतिक बँकेने दुष्काळ निवारण निधीतून ५ हजार कोटींचे कर्ज देऊन मदत करावी, अशी जागतिक बँकेला विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ही मदत मागण्यात आल्याचे त्यांनी येथे पत्रकारांना सांगितले.जागतिक बँकेच्या दुष्काळ निवारण निधीतून हे कर्ज मिळण्यास साधरणत: दीड वर्षे लागते. परंतु, महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर आमच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशी विनंती जागतिक बँकेच्या अधिकार्यांना केली आहे.