Drugs Delhi Airport: दिल्ली विमानतळावर 432 कोटींचे ड्रग्स जप्त, लोखंडी रॉडमध्ये लपवला होता माल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 01:17 PM2022-05-12T13:17:33+5:302022-05-12T13:17:50+5:30
Drugs Delhi Airport: महसूल गुप्तचर संचालनालयाने दिल्ली विमानतळातून 434 कोटी रुपयांचे 62 किलो हेरॉईन जप्त केले आहे.
नवी दिल्ली: दिल्लीविमानतळातून ड्रग्स तस्करीची मोठी घटना समोर आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) दिल्ली विमानतळातून 62 किलो हेरॉईन(Drugs) जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत तब्बल 434 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हा संपूर्ण माल एका एअर कार्गोमधून जप्त केला आहे.
ऑपरेशन ब्लॅक अँड व्हाईट मोहिमेअंतर्गत डीआरआयने या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. युगांडातून कार्गो विमानात ट्रॉली बॅगमध्ये 62 किलो हेरॉईन आणण्यात आले होते. DRE सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडातील एंटेबे येथून येणारा हा एअर कार्गो दुबईमार्गे एअर कार्गो कॉम्प्लेक्स IGI विमानतळ नवी दिल्ली येथे पोहोचला. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 434 कोटी रुपये आहे.
स्टीलच्या रॉडमध्ये हेरॉईन
विशेष म्हणजे, तस्करांनी हेरॉईन पिशवीत न भरता स्टीलच्या रॉडमध्ये भरले. हा माल कसाबसा युगांडातून दुबईत आला, पण विमान दिल्लीला पोहोचताच तो एजन्सीला सापडला. भारतात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आल्याची माहिती डीआरआयला आधीच मिळाली होती. विमानतळावरून 55 किलो आणि गुरुग्राममधून 7 किलो जप्त करण्यात आल्याचे डीआरआयच्या सूत्रांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात ड्रग्जसह 50 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
तिघांना अटक
या प्रकरणी DRI ने आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. हेरॉईनची ही खेप एअरकार्गोमधून पकडल्यानंतर डीआरआयच्या पथकाने एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यानंतर या व्यक्तीच्या चौकशीच्या आधारे हरियाणा आणि लुधियाना येथे छापे टाकण्यात आले. जिथून आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक व्यक्ती दिल्लीचा असून अन्य दोघे लुधियानाचे रहिवासी आहेत.