Drugs In Punjab: पंजाबच्या अटारी बॉर्डरवर 102 किलो हेरॉईन जप्त, किंमत तब्बल 700 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 08:26 AM2022-04-25T08:26:53+5:302022-04-25T08:27:01+5:30

Drugs In Punjab: पंजाबमधील भगवंत मान सरकारने ड्रग्स बंदीसाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. तरीदेखील दररोज अनेक तरुणांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू होताना दिसत आहे.

Drugs In Punjab: 102 kg heroin seized at Punjab's Attari border, valued at Rs 700 crore | Drugs In Punjab: पंजाबच्या अटारी बॉर्डरवर 102 किलो हेरॉईन जप्त, किंमत तब्बल 700 कोटी

Drugs In Punjab: पंजाबच्या अटारी बॉर्डरवर 102 किलो हेरॉईन जप्त, किंमत तब्बल 700 कोटी

Next

चंदीगड:पंजाबच्या अटारी बॉर्डरवरुन हेरॉईनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सीमाशुल्क अधिकार्‍यांनी अटारी येथील चेक पोस्टवरुन 102 किलो हेरॉईन जप्त केले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 700 कोटी रुपये किंमत आहे. ही हेरॉईन दिल्लीमधील एका व्यक्तीने अफगाणिस्तानातून आयात केलेल्या मुलेठीच्या बॉक्समध्ये पॅक करुन आणण्यात आले आहे.

गोलाकार लाकडांमध्ये लपवले ड्रग्स
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, मुलेठीच्या बॉक्सचे स्कॅनिंग करत असताना हे ड्रग्स आढळून आले. हे हेरॉईन दंडगोलाकार लाकडांमध्ये लपवले होते. अशा 475 किलो वजनाच्या लाकडांसोबत 102 किलो हेरॉईन लपवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे 700 कोटी रुपये आहे.

यापूर्वी पाचशे किलो हेरॉईन जप्त
हेरॉईनची ही खेप अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे भारतात आणण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पंजाबमध्येभगवंत मान सरकारने ड्रग्ज बंद करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. असे असतानाही दररोज अनेक तरुणांचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू होत आहे. उल्लेखनीय म्हणजे, अटारी येथे अफगाणिस्तानमधून सुका मेवा, ताजी फळे आणि औषधी वनस्पती यांच्यासोबत अनेकदा ड्रग्सची तस्करी केली जाते. यापूर्वी जून 2019 मध्ये सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमधून आलेले 532.6 किलो हेरॉईन जप्त केले होते.
 

Web Title: Drugs In Punjab: 102 kg heroin seized at Punjab's Attari border, valued at Rs 700 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.