ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मॉडेलला अटक
By admin | Published: June 23, 2016 05:19 PM2016-06-23T17:19:29+5:302016-06-23T17:19:29+5:30
ड्रग्ज रॅकेट प्रकरणी येथील एका टॉपच्या मॉडेलला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिका-यांनी अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शितमिता
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 23 - ड्रग्ज रॅकेट प्रकरणी येथील एका टॉपच्या मॉडेलला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिका-यांनी अटक केली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शितमिता गौडा असे या मॉडेलचे नाव असून ती माजी सौंदर्यवती आहे. तिच्यावर बंगळुरु, मंगळुरु आणि गोव्यातील हाय-प्रोफाईल ग्राहकांना आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेली दर्शितमिता ही पाचवी आहे.
येथील आर.टी. नगर परिसरात दर्शितमिताचा बायफ्रेंड निशांतच्या घरी २०१५ मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी करुन मोठ्याप्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्यावेळी दर्शितमिता त्याच्यासोबत राहत होती. याप्रकरणी निशांतला अटक केली होती. या ड्रग्ज संबंधी बरेच दिवस सुरु असलेल्या चौकशीनंतर निशांतने दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्जचा पुरवठा करण्याचे काम दर्शितमिता करत असल्याचे समोर आले आहे.