Delhi Election: ‘आप’चे विजयाचे ढोल; भाजपमध्ये भयाण शांतता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 04:46 AM2020-02-12T04:46:27+5:302020-02-12T08:19:21+5:30

६३ जणांचे डिपॉझिट जप्त : पराभवाच्या खात्रीने काँग्रेसमध्येही शुकशुकाट

The drum of victory for aap; Great peace in BJP | Delhi Election: ‘आप’चे विजयाचे ढोल; भाजपमध्ये भयाण शांतता

Delhi Election: ‘आप’चे विजयाचे ढोल; भाजपमध्ये भयाण शांतता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळातच निकालाचे ट्रेंड येऊ लागले व आम आदमी पक्षाच्या कार्यालयात ढोल वाजू लागले. आम्हालाच बहुमत मिळेल, असा दावा करणाऱ्या भाजपच्या काही अंतरावर असलेल्या मुख्यालयात भयाण शांतता होती. काँग्रेसच्या ७0 पैकी ६३ उमेदवारांची अनामत रक्कमच जप्त झाली. पराभवाचा अंदाज असल्याने काँग्रेसच्या कार्यालयामध्येही शुकशुकाट होता.


मतमोजणी सकाळी आठला सुरू झाली. एक तासानंतर ट्रेंड येऊ लागले. ‘आप’चे उमेदवार आघाडीवर आहेत, हे स्पष्ट होताच कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. त्यांचा उत्साह गगनात मावत नव्हता. कार्यालय निळ्या व पांढºया फुग्यांनी सजविले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मोठे कट-आउट्स लावले होते. निकाल आपल्याच बाजूने लागणार ही खात्री असल्याने जल्लोषाची आधीच व्यवस्था केली होती. ‘आप’चे कार्यकर्ते ढोल-ताश्याच्या तालावर थिरकत असताना, भाजप व काँग्रेसच्या कार्यालयांत शुकशुकाट होता. दोन्ही कार्यालयांत नेते सोडा, कार्यकर्तेही आले नव्हते. भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी व मोजके पदाधिकारी होते. आपच्या बाजूने चित्र दिसत असताना, मनोज तिवारी मात्र अंतिम निकाल आमच्याच बाजूने लागेल, असे अखेरपर्यंत सांगत होते.

केजरीवाल यांची गाजलेली वाक्ये...
आम्हाला राजकारण करायचे नसून जनतेचे सरकार आणायचे आहे.
जो भ्रष्ट राजकारणाला कंटाळला आहे, तो ‘आम आदमी’ आहे.
दिल्लीच्या सामान्य जनतेने देशाच्या राजकारणाला दिशा दिली.
दिल्लीच्या जनतेने भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची हिंमत दाखविली आहे.
मोठ्या पक्षांचा अहंकार मोडून काढण्यासाठी आपचा जन्म झाला आहे.
प्रामाणिक मार्गावर काटे असतात. ते काटे उखडून फेकायचे आहेत.
निवडणुका प्रामाणिकपणे जिंकता येऊ शकतात, हे ‘आप’ने सिद्ध केले.
व्यवस्था सुधारण्यासाठी राजकारणाच्या दलदलीत उतरावे लागेल.

फटाके न फोडताच आपचा जल्लोष
दिल्लीमध्ये प्रचंड विजय मिळाला असला, तरी या शहरातील प्रदूषणवाढ रोखण्यासाठीचे पाऊल म्हणून आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडू नयेत, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेले आदेश मंगळवारी पाळण्यात आले. दिल्लीतील आप मुख्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले नाहीत.
विजयोत्सव साजरा करताना आपच्या कार्यकर्त्यांनी प्रेमाने एकमेकांना आलिंगन दिले. मात्र, फटाके अजिबात फोडले नाहीत. आपचे कार्यकर्ते पक्षाच्या मुख्यालयाबाहेर परस्परांना व तिथून येणाºया-जाणाऱ्यांच्या तोंडात लाडू भरवत होते. बँडबाजाच्या तालावर काही जण नाचतही होते. दिल्लीतील वायुप्रदूषण कमी करू, असे आश्वासन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दिले होते. त्या दिशेने त्यांनी तातडीने पावले टाकल्याची चर्चा आहे.

Web Title: The drum of victory for aap; Great peace in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.