धक्कादायक! दिल्ली फ्लाइटमध्ये पुन्हा मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघुशंका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 09:55 AM2023-03-05T09:55:04+5:302023-03-05T09:56:22+5:30

काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते.

drunk flyer on new york to delhi american airlines flight urinates on fellow passenger | धक्कादायक! दिल्ली फ्लाइटमध्ये पुन्हा मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघुशंका

धक्कादायक! दिल्ली फ्लाइटमध्ये पुन्हा मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघुशंका

googlenewsNext

काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी एअर इंडियाच्या कार्मचाऱ्यांसह त्या प्रवाशावर कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आणखी एक प्रकरण समोर आले आहे. न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने आपल्या सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप केला आहे. 

अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक AA292 मध्ये ही घटना घडली. शुक्रवारी रात्री ९.१६ वाजता न्यूयॉर्कहून विमानाने उड्डाण केले आणि १४ तास २६ मिनिटांच्या उड्डाणानंतर शनिवारी रात्री १०.१२ वाजता येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

आरोपी कथितपणे अमेरिकन विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि त्याने मद्यधुंद अवस्थेत झोपेत लघुशंका केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विद्यार्थ्याने या घाणेरड्या कृत्याबद्दल माफी मागितली, त्यानंतर पीडित प्रवाशाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार दिला कारण यामुळे त्याचे करियर खराब होऊ शकते. मात्र, विमान कंपनीने ते गांभीर्याने घेत आयजीआय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली. एटीसीने सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना सतर्क केले, त्यांनी आरोपी प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले.

...म्हणून बायको खूप नाराज आहे, सुट्टी द्या; पोलिसाचा विनंती अर्ज व्हायरल

काही महिन्यापूर्वी अशीच घटना घडली होती. नोव्हेंबरमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली होती, एका मद्यधुंद प्रवाशाने एअर इंडियाच्या न्यूयॉर्क ते नवी दिल्लीच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघुशंका केली होती.

Web Title: drunk flyer on new york to delhi american airlines flight urinates on fellow passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान