मद्यधुंद प्रवाशाचा विमानात धिंगाणा, इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न, झाली अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 09:00 AM2023-04-08T09:00:13+5:302023-04-08T09:02:20+5:30

विमान बंगळुरू विमानतळावर उतरल्यावर त्या व्यक्तीला सीआयएसएफच्या (CISF) ताब्यात देण्यात आले.

drunk passenger held for trying to open emergency door flap of delhi bengaluru indigo flight | मद्यधुंद प्रवाशाचा विमानात धिंगाणा, इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न, झाली अटक!

मद्यधुंद प्रवाशाचा विमानात धिंगाणा, इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न, झाली अटक!

googlenewsNext

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत विमान प्रवासादरम्यान मद्यधुंद प्रवासी गैरवर्तन करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशीच आणखी एक घटना शुक्रवारी घडली. एका मद्यधुंद प्रवाशाने इंडिगोचे (IndiGO) दिल्ली-बंगळुरू विमान (Delhi-Bengaluru Flight)  उड्डाण करत असताना इमर्जन्सी दार (Emergency Door) उघडण्याचा प्रयत्न केला. प्रवाशाची वर्तवणूक पाहून क्रू मेंबरने विमानाच्या कॅप्टनला माहिती दिली. त्यानंतर कॅप्टनने त्या व्यक्तीला लगेच इशारा दिला. यानंतर विमान बंगळुरू विमानतळावर उतरल्यावर त्या व्यक्तीला सीआयएसएफच्या (CISF) ताब्यात देण्यात आले.

इंडिगोच्या अधिकृत प्रसिद्धीनुसार, दिल्ली-बंगळुरू इंडिगो विमानाच्या इमर्जन्सी दरवाजाचे फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 40 वर्षीय मद्यधुंद प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 7.56 च्या सुमारास आयजीआय विमानतळावरून उड्डाण केलेल्या विमान क्रमांक 6E 308 मध्ये घडली. यावेळी या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत इमर्जन्सी एक्झिट फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला, असे संपूर्ण घटनेची माहिती देताना इंडिगोने सांगितले.

याचबरोबर, इंडिगो एअरलाइन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशाची वर्तवणूक लक्षात आल्यानंतर विमानातील क्रू मेंबरने कॅप्टनला सतर्क केले आणि प्रवाशाला लगेच सावध करण्यात आले. तसेच, संबंधित विमानाच्या सुरक्षित ऑपरेशनमध्ये कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. बंगळुरूला पोहोचल्यावर प्रवाशाला सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे

Web Title: drunk passenger held for trying to open emergency door flap of delhi bengaluru indigo flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान