धक्कादायक! तीन महिन्यात तिसरी घटना, एअर होस्टेसचा हात पकडला...; स्वीडिश नागरिकाने केला विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 02:33 PM2023-04-01T14:33:43+5:302023-04-01T14:37:58+5:30

काही दिवपासूर्वी एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने सहप्रवाशावर नशेत लघुशंका केल्याची घटना समोर आली होती.

drunk swedish flyer molests indigo air hostess | धक्कादायक! तीन महिन्यात तिसरी घटना, एअर होस्टेसचा हात पकडला...; स्वीडिश नागरिकाने केला विनयभंग

धक्कादायक! तीन महिन्यात तिसरी घटना, एअर होस्टेसचा हात पकडला...; स्वीडिश नागरिकाने केला विनयभंग

googlenewsNext

काही दिवपासूर्वी एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने सहप्रवाशावर नशेत लघुशंका केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले होते. आता इंडिगोच्या विमानातही अशीच घटना घडल्याचे समोर आले.  इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात एका स्वीडिश नागरिकाने एअर होस्टेससोबत गैरवर्तन केले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी फ्लाइट लँड होताच आरोपी प्रवाशाला अटक केली. सध्या त्याची महानगर न्यायाधीशांच्या न्यायालयातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. क्लास एरिक हॅराल्ड जॉन्स वेस्टबर्ग असे आरोपीचे नाव आहे. 

आतापर्यंत, गेल्या तीन महिन्यांत, विमानात गैरवर्तन केल्याप्रकरणी आठव्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. एअर होस्टेसने आता या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. विमानात प्रवाशांना जेवण देत असताना आरोपी प्रवाशाने चिकन डिशची मागणी केली. जेवण दिल्यानंतर त्यांनी कार्ड स्वॅप करण्यासाठी पीओएस मशीन दिले, त्यानंतर आरोपीने अर होस्टेसचा हात पकडला, असा आरोप यात करण्यात आला आहे. 

जिंकणाऱ्या काँग्रेसला थोपविण्यासाठी भाजपाचे 'अमेरिका मॉडेल'; कर्नाटकात आमदारांमध्ये नाराजी

यावेळी एअर होस्टेसने विरोध केला असता आरोपीने तिचा विनयभंग केला. विरोध केल्यावर आरोपी प्रवाशाने सहप्रवाशांशीही गैरवर्तन केले. अशा परिस्थितीत विमान मुंबईत पोहोचताच पोलिसांनी आरोपी प्रवाशाला अटक केली. यानंतर आरोपीला महानगर न्यायाधीशांच्या न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. यापूर्वी रविवारीही असेच एक प्रकरण समोर आले होते. 

२२ मार्च रोजी दुबई मुंबई फ्लाइटमध्ये जॉन डिसोझा आणि दत्तात्रेय आनंद बापरेडकर नावाच्या प्रवाशांनी क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले. या आरोपींनीही दारूच्या नशेत ही घटना घडली. हवेत उडणाऱ्या विमानाचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर मुंबईत पोहोचल्यानंतर आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Web Title: drunk swedish flyer molests indigo air hostess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.