मद्यपी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा

By admin | Published: December 25, 2015 11:56 PM2015-12-25T23:56:43+5:302015-12-25T23:56:43+5:30

जळगाव: मारहाण झाल्याची तक्रार घेत नसल्याने एका मद्यपीने शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या आवारात धिंगाणा घातला. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता भागवत शिंदे असे तो सांगत होता. हरविठ्ठल नगरात राहायला असून आकाशवाणी चौकात काही जणांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचे तो सांगत होता. मात्र कोणी व का? मारले याबाबत काहीच सांगत नसल्याने पोलिसांचीही अडचण झाली होती. मी सकाळी साडे अकरा वाजताही पोलीस स्टेशनला आलो, मात्र तेव्हाही माझी तक्रार घेतली नाही असे त्याचे म्हणणे होते. दुपारीही पुरेशी माहिती सांगत नसल्याने कोणाविरुध्द तक्रार दाखल करावी या पेचात पोलीस सापडले होते. त्याच्या तोंडावर जबर मारहाण झाली होती तर अंगावरील कपडेही फाटलेले होते. पोलीस स्टेशनच्या आवारात गोंधळ घालत त्याने बाहेरचा रस्ता धरला.

Drunken in an alcoholic police station | मद्यपी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा

मद्यपी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा

Next
गाव: मारहाण झाल्याची तक्रार घेत नसल्याने एका मद्यपीने शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या आवारात धिंगाणा घातला. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता भागवत शिंदे असे तो सांगत होता. हरविठ्ठल नगरात राहायला असून आकाशवाणी चौकात काही जणांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचे तो सांगत होता. मात्र कोणी व का? मारले याबाबत काहीच सांगत नसल्याने पोलिसांचीही अडचण झाली होती. मी सकाळी साडे अकरा वाजताही पोलीस स्टेशनला आलो, मात्र तेव्हाही माझी तक्रार घेतली नाही असे त्याचे म्हणणे होते. दुपारीही पुरेशी माहिती सांगत नसल्याने कोणाविरुध्द तक्रार दाखल करावी या पेचात पोलीस सापडले होते. त्याच्या तोंडावर जबर मारहाण झाली होती तर अंगावरील कपडेही फाटलेले होते. पोलीस स्टेशनच्या आवारात गोंधळ घालत त्याने बाहेरचा रस्ता धरला.

Web Title: Drunken in an alcoholic police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.