निवडणूक काळात दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये दारूचा महापूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 12:59 PM2017-12-15T12:59:53+5:302017-12-15T13:02:13+5:30

गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. पण निवडणूक काळातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात तब्बल...

The drunkenness of liquor in the state of Gujarat, during the election period | निवडणूक काळात दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये दारूचा महापूर

निवडणूक काळात दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये दारूचा महापूर

googlenewsNext

अहमदाबाद: गुजरातचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. पण निवडणूक काळातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात तब्बल 24 कोटी रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. 
निवडणूक काळात गुजरातमध्ये 30.6 लाख रूपयांची देशी दारू आणि 23.50 कोटी रूपयांची भारतीय बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये अखेरच्या दोन दिवसांचा समावेश नाही, 25 ऑक्टोबर ते  12 डिसेंबर या काळातील ही आकडेवारी आहे. 
याशिवाय येथे 29.16 कोटी रुपये किमतीची वाहने देखील जप्त करण्यात आली आहे. तसंच 26 हजार 913 जणांना अटक करण्यात आली आहे.  
विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान 9 डिसेंबर रोजी झाले आहे तर दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला झाले. मतदानानंतर विविध चॅनल्सनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा येथे पुन्हा एकहाती सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

Web Title: The drunkenness of liquor in the state of Gujarat, during the election period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.