Dry Day List 2023: 'ड्राय डे'ची यादी जाहीर! २०२३ मध्ये एकूण २२ दिवस बंद राहणार दारुची दुकानं, वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:54 PM2022-12-30T17:54:58+5:302022-12-30T17:56:16+5:30
नववर्ष स्वागताची यंदा जय्यत तयारी केली जात आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनवर बंधनं आली होती.
नवी दिल्ली-
नववर्ष स्वागताची यंदा जय्यत तयारी केली जात आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनवर बंधनं आली होती. पण यंदा कोणतीही बंधनं नाहीत. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर देशात मद्याची विक्री प्रचंड वाढते. पण देशात असे अनेक दिवस असतात की ज्या दिवशी मद्य विक्रीला पूर्णपणे बंदी असते. या दिवसांना 'ड्राय डे' असं म्हटलं जातं. आता २०२३ या वर्षातील 'ड्राय डे'ची यादी समोर आली आहे.
भारतातील सर्व राज्यांमध्ये प्रमुख राष्ट्रीय सणांना आणि प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी), स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्ट) आणि गांधी जयंती (२ ऑक्टोबर) रोजी ड्राय डे घोषीत असतो. याशिवाय आणखी कोणकोणत्या दिवशी नववर्षात ड्राय डे असणार आहे हे जाणून घेऊयात.
२०२३ सालच्या 'ड्राय डे'ची यादी पुढील प्रमाणे...
- १४ जानेवारी- मकर संक्रांत (काही राज्यांमध्ये)
- २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन (संपूर्ण देशात ड्राय डे)
- ३० जानेवारी- महात्मा गांधी पुण्यतिथी (संपूर्ण देशात)
- ८ मार्च- होळी (काही राज्यात)
- ३० मार्च- रामनवमी (काही राज्यांत)
- ४ एप्रिल- महावीर जयंती (काही राज्यांत)
- ७ एप्रिल- गुड फ्रायडे
- १४ एप्रिल- आंबेडकर जयंती
- २२ एप्रिल- ईद उल-फितर
- २९ जून- आषाढी एकादशी (काही राज्यांमध्ये)
- ३ जुलै- गुरुपौर्णिमा (काही राज्यांमध्ये)
- २९ जुलै- मोहरम
- १५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन (संपूर्ण देशात)
- ६ सप्टेंबर- जन्माष्टमी (काही राज्यांमध्ये)
- १९ सप्टेंबर- गणेश चतुर्थी (काही राज्यांमध्ये)
- २८ सप्टेंबर- अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद (काही राज्यांमध्ये)
- २ ऑक्टोबर- गांधी जयंती (संपूर्ण देशात)
- २४ ऑक्टोबर- दसरा (काही राज्यांमध्ये)
- २८ ऑक्टोबर- महर्षी वाल्मिकी जयंती
- १२ नोव्हेंबर- दिवाळी (संपूर्ण देशात)
- २७ नोव्हेंबर- गुरुपर्व (काही राज्यांमध्ये)
- २५ डिसेंबर- ख्रिसमस
'ड्राय डे'च्या या तारखांसोबतच वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक सण आणि जयंतीनुसार 'ड्राय डे' जाहीर केला जातो. ज्या शहरात 'ड्राय डे' असतो तिथं मद्यविक्रीची दुकानं बंद ठेवण्यात येतात. याशिवाय ज्या ठिकाणी निवडणूक मतदान असते त्याठिकाणीही मतदानाच्या ४८ तास आधीपासूनच मद्याच्या विक्रीवर बंदी असते.
देशात बिहार आणि गुजरात सारखी राज्य 'ड्राय स्टेट' आहेत. जिथं मद्यविक्रीवर बंदी आहे. देशातील विविध ठिकाणच्या सुट्ट्यांनुसार काही खास दिवशी ड्राय डे जाहीर केले जातात.