तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी; यावर्षी २६ दिवस दारूची दुकानं बंद; पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 10:58 AM2022-03-23T10:58:02+5:302022-03-23T10:59:35+5:30

नव्या आर्थिक वर्षात एकूण २६ दिवस दारूची विक्री बंद; पाहा ड्राय डेजची संपूर्ण यादी

dry days list in india upcoming financial year liquor shop close | तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी; यावर्षी २६ दिवस दारूची दुकानं बंद; पाहा संपूर्ण यादी

तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी; यावर्षी २६ दिवस दारूची दुकानं बंद; पाहा संपूर्ण यादी

Next

नवी दिल्ली: आर्थिक वर्ष संपायला काही दिवस शिल्लक आहेत. १ एप्रिलपासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. दारूच्या दुकानांचं नवीन आर्थिक वर्षही एप्रिलपासूनच सुरू होतं. नव्या आर्थिक वर्षात दारूची दुकानं नेमकी किती दिवस आणि कधी बंद राहणार असे प्रश्न तळीरामांना पडले आहेत.

ड्राय डेला दारूची दुकानं बंद असतात. त्या दिवशी मद्यविक्री बंद असते. दारू विक्री करणारी दुकानं बंद असतात. दारूची दुकानं कधी बंद ठेवायची याचा निर्णय राज्य सरकारचा असतो.  एप्रिल ते मार्च या कालावधीत किती ड्राय डे आहेत त्याची यादी राज्यांनुसार खालीलप्रमाणे...

एप्रिल २०२२
- १० एप्रिल (राम नवमी) : जम्मू
- १४ एप्रिल (महावीर जयंती, आंबेडकर जयंती) : राज्‍याचं नाव नाही
- १५ एप्रिल (गुड फ्रायडे) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही

मे २०२२
- १ मे (महाराष्ट्र दिन) : महाराष्ट्र
- ३ मे (ईद-उल-फितर) : काश्मीर

जुलै २०२२
- १० जुलै (आषाढी एकादशी) : महाराष्ट्र
- १३ जुलै (गुरू पौर्णिमा) : महाराष्ट्र

ऑगस्ट २०२२
- ८ ऑगस्ट (मोहरम) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही
- १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) : पूर्ण देशभरात
- १९ ऑगस्ट (जन्माष्टमी) : जम्मू, काश्मीर
- ३१ ऑगस्ट (गणेश चतुर्थी) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही

सप्टेंबर २०२२
- ९ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) : महाराष्ट्र

ऑक्टोबर २०२२
- २ ऑक्टोबर (गांधी जयंती) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही - ५ ऑक्टोबर (दसरा) : पश्चिम बंगाल
- ९ ऑक्टोबर (वाल्मिकी जयंती) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही
- २४ ऑक्टोबर (दिवाळी) : पूर्ण देशात

नोव्हेंबर २०२२
- ४ नोव्हेंबर (कार्तिकी एकादशी) : महाराष्ट्र
- ८ नोव्हेंबर (गुरू नानक जयंती) : जम्मू

डिसेंबर २०२२
- २५ डिसेंबर (ख्रिसमस) : पूर्ण देशभरात

जानेवारी २०२३
- १४ जानेवारी (मकर संक्रांत) : राज्‍याचं नाव नाही
- २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन): पूर्ण देशात
- ३० जानेवारी (शहीद दिवस): विशिष्ट राज्‍याचं नाव नाही

फब्रुवारी २०२३
- १५ फेब्रुवारी (स्वामी दयानंद सरस्वती जयंती) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही
- १८ फेब्रुवारी (महाशिवरात्र) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही
- १९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही

मार्च २०२३
- ८  मार्च (होळी) : विशिष्ट राज्‍याचं नाव नाही

Web Title: dry days list in india upcoming financial year liquor shop close

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.