दिल्लीमध्ये भाऊबीजेनिमित्त महिला करणार बसने मोफत प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 09:44 AM2018-11-09T09:44:17+5:302018-11-09T09:46:11+5:30
दिल्लीमध्येही भाऊबीजेचे औचित्य साधून दिल्ली परिवहन निगम (डीटीसी)ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील महिलांना भाऊबीजेच्या दिवशी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.
नवी दिल्ली - 'भाऊबीज' हा बहिण भावाचं गोड नातं दृढ करणारा सण. सणाच्या निमित्ताने बहिण भाऊ एकमेकांना छान भेटवस्तू देत असतात. दिल्लीमध्येही भाऊबीजेचे औचित्य साधून दिल्ली परिवहन निगम (डीटीसी)ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील महिलांना भाऊबीजेच्या दिवशी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. दिल्ली परीवहन निगम (डीटीसी) ने गुरुवारी (8 नोव्हेंबर) ही घोषणा केली.
दिल्लीतील महिला शुक्रवारी (9 नोव्हेंबर) म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी दिल्ली-एनसीआरमध्ये दिल्ली परिवहन निगमच्या एसी आणि नॉनएसी बसमधून दिवसभर मोफत प्रवास करणार आहेत. महिला प्रवासी प्रवास करताना कोणतेही भाडे आकारले जाणार नाही. तसेच गर्दी टाळण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यात आल्या आहेत. डीटीसी दरवर्षी महिलांना मोफत प्रवास करण्याची संधी देते.