आयशरच्या धडकेत दुचाकीस्वारा ठार कुसंुब्याजवळ अपघात : बैल घेऊन जाणार्या ट्रकने दिली धडक
By Admin | Published: February 11, 2016 11:00 PM2016-02-11T23:00:21+5:302016-02-11T23:00:21+5:30
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या आयशरने समोरून येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मनोहर सुभाष इंगळे (वय २८ रा.रोईनखेडा ता.मुक्ताईनगर जि.बुलढाणा ह.मु.कुसुंबा ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी दीड वाजता कुसुंबा गावाजवळ महामार्गावरील हॉटेल निलांबरी समोर झाला. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
ज गाव: भरधाव वेगाने जाणार्या आयशरने समोरून येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मनोहर सुभाष इंगळे (वय २८ रा.रोईनखेडा ता.मुक्ताईनगर जि.बुलढाणा ह.मु.कुसुंबा ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी दीड वाजता कुसुंबा गावाजवळ महामार्गावरील हॉटेल निलांबरी समोर झाला. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.मनोहर हा कुसुंबा येथून दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.डी.९०६४) जळगाव शहरात येत होता तर धुळे येथून आयशर (क्र.एम.एच.१८ ए.ए.०५६४) बैल घेवून औरंगाबादकडे जात होता. हॉटेल निलांबरीसमोर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मनोहर याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला.याच वेळी रस्त्याने येणार्या हितेश रवींद्र नेवे या तरुणाने तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली. कोळी व पोलिसांच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मनोहरचा कचोरी विक्रीचा व्यवसायमनोहर याची परिस्थिती अत्यंत हलाखीचे आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी तो कुसुंब्यात स्थायिक झाला होता. गेल्या चार वर्षापासून तो भगीरथ कोळी यांच्या घरात पत्नीसह भाड्याने रहात होता. घरी कचोरी बनवून कुसुंबा बसस्थानकावर व्यवसाय करीत होता. चांगल्या स्वभावामुळे त्याने अल्पावधितच ग्रामस्थांची मने जिंकली होती. पत्नीचा प्रचंड आक्रोशअपघाताची माहिती मिळाल्यानंतर पत्नी स्वाती व शेजारी राहणार्या महिला, पुरुषांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पतीचा मृतदेह पाहताच पत्नीने हंबरडा फोडत प्रचंड आक्रोश केला. तिला सावरणार्या महिलांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते. मनोहर याच्या पात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. अपघाताची माहिती त्याच्या गावात कळविण्यात आली आहे.बैल गोशाळेत रवानाअपघाताची माहिती मिळाल्यानंतर सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे,कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील यांनी आयशर चालक सुलतान सैयद मुनाब (रा.धुळे)याला ताब्यात घेऊन ट्रकमधील अकरा बैलांना कुसुंबा येथील गोशाळेत पाठविण्यात आले. अपघातासह बैलांची निर्दयापणे वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे धारबळे यांनी सांगितले.