बदकांमुळे वाढतो पाण्यात ऑक्सिजन; विप्लव देव यांचा 'शोध'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 05:25 PM2018-08-28T17:25:22+5:302018-08-28T17:59:16+5:30

नीरमहल येथे नौकानयन स्पर्धेचा शुभारंभ करताना त्यांनी आपली 'मते' मांडली.

ducks help to increase oxygen in water-Bibplab Deb | बदकांमुळे वाढतो पाण्यात ऑक्सिजन; विप्लव देव यांचा 'शोध'

बदकांमुळे वाढतो पाण्यात ऑक्सिजन; विप्लव देव यांचा 'शोध'

Next

आगरतळा- अत्यंत विचित्र विधानांमुळे चर्चेत येणाऱ्या विप्लव देव यांनी आता एक नवे विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. पाण्यात बदक पोहल्यामुळे पाण्यात ऑक्सिजन वाढतो असे विधान त्यांनी केले आहे. पाण्यात ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यासाठी ते संपूर्ण राज्यात बदकांचे वाटप करण्याचा विचार करत आहेत.

देव यांच्या मते, बदक वाटल्यामुळे ग्रामिण अर्थव्यवस्थेत तेजी येईल. बदक पाण्यात पोहल्यामुळे पाण्याचे रिसायकलिंग होते आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. नीरमहल येथे नौकानयन स्पर्धेचा शुभारंभ करताना त्यांनी आपली 'मते' मांडली. विप्लव देव त्यांच्या सरकारतर्फे मासेमारी करणाऱ्या लोकांना 50 हजार बदकांचे वाटप करणार आहेत. जलाशयांच्या शेजारी पर्यटन केंद्रांजवळ यांचे वाटप होईल आणि त्यामुळे निसर्ग सौंदर्यात भर पडेल व ग्रामिण अर्थव्यवस्थेत भर पडेल असे त्यांना वाटते.



या संदर्भात देव म्हणाले, जेव्हा बदक पाण्यात पोहतात तेव्हा पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण आपोआप वाढते. त्यामुळे ऑक्सिजनचे रिसायकलिंग होते. पाण्यातील माशांना अधिक ऑक्सिजन मिऴतो. मग मासेही मोठ्या संख्येने वाढतात व नैसर्गिक पद्धतीने मत्स्यपालनाची वृद्धी होते. विप्लव देव त्यांच्या अशा विधानांमुळे चर्चेत येतात. मॉब लिचिंगमागे परदेशी षडयंत्र असल्याचेही विधान त्यांनी केले होते.

त्रिपुरात ‘एनआरसी’ची आवश्यकता नाही

यापुर्वी विप्लव देव यांनी अनेकदा अशी विधाने केली होती. याआधी त्यांनी एकदा आपल्या कामात नाक खुपसायचा प्रयत्न केल्यास मी त्याची नखंच तोडून टाकेन असं विधान केलं होतं. सकाळी ८ वाजता भाजी विक्रेता बाजारात दुधी घेऊन येतो आणि ९ वाजेपर्यंत त्यांची पार वाट लागते. कारण, येणारा प्रत्येक ग्राहक या दुधीला नखं लावत असतो. मी असं होऊ देणार नाही.  माझ्या सरकारला कुणीही हात लावू शकत नाही. त्यात कुणी नाक खुपसलं, हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर मी त्यांची नखंच तोडून टाकेन', असं विधान करून विप्लव देव यांनी पुन्हा नवा वाद ओढवून घेतला होता.




मोदी 'हिऱ्या'ला दाखवणार हिसका; बिप्लब देब यांना वादग्रस्त विधानं भोवणार

त्रिपुरामध्ये भाजपानं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, तरुण-तडफदार विप्लव देव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली होती. त्यांच्याकडून सगळ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या असताना, एका भलत्याच विधानामुळे ते प्रकाशझोतात आले. महाभारत काळातही इंटरनेट आणि सॅटेलाइट अस्तित्वात होतं, असं अजब तर्कट त्यांनी मांडलं होतं. त्यावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक थांबते न थांबते, तोच मिस युनिव्हर्स डायना हेडन हिचं जिंकणं फिक्सिंग होतं, असा दावा त्यांनी केला. त्यावरूनही खल झाला. पण, विप्लव देव स्वस्थ बसले नाहीत. तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा पान टपऱ्या उघडाव्यात, गायी पाळाव्यात, असा विचित्र सल्ला देऊन ते पुन्हा टीकेचे धनी ठरले होते.



 

Web Title: ducks help to increase oxygen in water-Bibplab Deb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.