5 वर्षाच्या चिमुकलीमुळे खूनी पित्याला झाली अटक
By Admin | Published: September 18, 2016 04:38 PM2016-09-18T16:38:59+5:302016-09-18T16:38:59+5:30
बुधवारी रात्री जेव्हा 29 वर्षीय सुप्रीताचा मृतदेह स्वतःच्याच घरात मिळाला तेव्हाच ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा पोलिसांना दाट संशय होता. मात्र पोलिसांकडे कोणताही पुरावा
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू,दि18- बुधवारी रात्री जेव्हा 29 वर्षीय सुप्रीताचा मृतदेह स्वतःच्याच घरात मिळाला तेव्हाच ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा पोलिसांना दाट संशय होता. मात्र पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता. मृत महिलेच्या 5 वर्षाच्या मुलीमुळेच ही केस सोडवणं पोलिसांना शक्य झालं आणि त्या चिमुकलीने आपल्या खूनी पित्याला पकडून देण्यात महत्वाची भूमीका बजावली.
रविराज शेट्टी असं आरोपीचं नाव आहे. आपली पत्नी ही मनोरूग्ण होती त्यामुळेच तिने आत्महत्या केली असं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यावेळी मी घरी नव्हतो आणि माझी मुलगी झोपली होती असं तो म्हणाला. त्यावेळी चिमुकल्या रितूसोबत बोलण्याचं पोलिसांनी ठरवलं पण तिला याबाबत विचारणं सोप्पं नव्हतं. तिची आई रूग्णालयात आहे असंच तिला माहीत होतं. एका महिला सब-इन्स्पेक्टरवर ही जबाबदारी सोपावण्यात आली. जेव्हा महिला पोलिसांनी रितूला आई विषयी विचारलं तेव्हा आई रूग्णालायात आहे असं तिने सांगितलं. आई जखमी कशी काय झाली नेमकं काय झालं होतं असं विचारल्यावर तिने सांगितलं की पप्पा आईला खांद्यावर उचलून किचनमध्ये गेले होते पण जेव्हा ते बाहेर आले तेव्हा आईच्या शरीरावर रक्त होतं. त्यावेळी आई किचनमध्ये पडली आणि तिला आता रूग्णालयात दाखल करावं लागेल असं तिला तिच्या वडिलांनी सांगितलं. त्यानंतर रिंकूच्या सांगण्यवरून पोलिसांनी खूनी पतीला अटक केली.