रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू अपघात : भादली ते जळगाव दरम्यान घडली घटना

By admin | Published: April 12, 2016 12:30 AM2016-04-12T00:30:18+5:302016-04-12T00:30:18+5:30

जळगाव : धावत्या रेल्वेखाली आल्याने अश्वीन उर्फ मनीष राजेंद्र सोनवणे (वय २५, रा.वाल्मीकनगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.१० वाजेपूर्वी भादली ते जळगाव दरम्यान अप रेल्वेमार्गावर घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Due to the accident, the accident took place between Bhadli and Jalgaon | रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू अपघात : भादली ते जळगाव दरम्यान घडली घटना

रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू अपघात : भादली ते जळगाव दरम्यान घडली घटना

Next
गाव : धावत्या रेल्वेखाली आल्याने अश्वीन उर्फ मनीष राजेंद्र सोनवणे (वय २५, रा.वाल्मीकनगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.१० वाजेपूर्वी भादली ते जळगाव दरम्यान अप रेल्वेमार्गावर घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनीष सोनवणे याचे मामा सुरेंद्र श्रावण मोरे हे भुसावळला राहतात. त्यांना भेटण्यासाठी तो रविवारी भुसावळला गेलेला होता. सोमवारी सकाळी भुसावळ येथून जळगावला येण्यासाठी तो रेल्वेने निघाला होता. रस्त्यात भादली ते जळगाव दरम्यान (रेल्वे खांब क्रमांक ४२१/१८-२०) तो रेल्वे गाडीतून पडला. त्यात रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी ९.१० वाजेपूर्वी घडली. ही घटना समोर आल्यानंतर जळगाव रेल्वे स्थानकाचे उप स्थानक प्रबंधक शरद वसंत मोरे यांनी दिलेल्या माहितीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल नरेश सपकाळे करीत आहेत. सुरुवातीला मनीषची ओळख पटलेली नव्हती. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यावर काही कालावधीनंतर त्याची ओळख पटली. दुपारच्या सुमारास मनीषवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या प›ात पत्नी, आई, दोन बहिणी व भाऊ असा परिवार आहे.
२ वर्षांपूर्वी झाले होते लग्न
मनीषचे २ वर्षांपूर्वी लग्न झालेले होते. ४ ते ५ महिन्यांपूर्वी तो अहमदाबाद येथे कामाला होता. ते काम सोडून घरी परतला होता. त्यानंतर तो त्याच्या मामांकडेही भुसावळला राहत होता. सोमवारी तो जळगावला येत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याचे वडील महापालिकेच्या बांधकाम विभागात नोकरीला होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचेही निधन झाले होते. वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागण्यासाठी त्याने प्रयत्न केले होते. परंतु त्यात यश आले नव्हते, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांकडून मिळाली.

Web Title: Due to the accident, the accident took place between Bhadli and Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.