अशोक चव्हाणांमुळे मुंबईतील आघाडी संपुष्टात
By admin | Published: January 21, 2017 02:10 AM2017-01-21T02:10:23+5:302017-01-21T02:10:23+5:30
सुनील तटकरे :
Next
स नील तटकरे : - जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरूरत्नागिरी : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची शक्यता संपुष्टात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. मुंबईसाठीच्या आघाडीचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. त्याबाबतचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच कोकण शिक्षक मतदार संघात निवडणूक लढविणारे पुरोगामी आघाडीचे बाळाराम पाटील यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ते रत्नागिरीत आले होते.या पत्रकार परिषदेला शेकापचे आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार संजय कदम, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे नेते बशीर मुर्तुझा उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसशी आघाडी करण्याची राष्ट्रवादीची इच्छा होती. पण अशोक चव्हाण यांच्यामुळे ती तुटली आहे. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकीसाठी मात्र राष्ट्रवादी, कॉँग्रेस व शेकापची आघाडी होणार आहे. काही जिल्ात स्थानिक पातळीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू आहे. राज्यभरात या निवडणुकीसाठी आघाडी व्हावी यासाठी कॉँग्रेसबरोबर एक बैठक झाली आहे. दुसर्या टप्प्यातील संसदीय बोर्डाची बैठक येत्या २५ जानेवारीला होणार आहे. येत्या चार दिवसांत आघाडीबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे तटकरे म्हणाले. या आघाडीत शेतकरी कामगार पक्षही सहभागी होत असल्याचे तटकरे म्हणाले. यावेळी उपस्थित शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी त्याला दुजोरा दिला. चौकटटिष्ट्वटरवर केवळ टिव टिव...गेली दोन वर्ष ३ महिन्याच्या काळात केंद्रात व राज्यातही सत्ताधार्यांनी टिष्ट्वटरवरून विकासकामांबाबत अनेकवेळा टिष्ट्वट केले. हे आश्वासनांचे बुडबुडे केव्हाच फुटले आहेत. सत्ताधार्यांचे हे टिष्ट्वट म्हणजे केवळ टिव टिव ठरल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली.चौकटनोटाबंदीने शेतकरी उद्ध्वस्त...नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्याने हा निर्णय फसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून, विकासदर २ टक्क्यांनी घटला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कामगारांवर बेकारीचे संकट आले आहे. चुकीचे निर्णय हाने राबविल्याचे हे फलित आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.