पाठीच्या त्रासामुळे खडसेंकडून खाजगी कारचा वापर लाल दिवा टाळला : शासकीय कारमध्ये बिघाडाची चर्चा

By admin | Published: May 31, 2016 11:22 PM2016-05-31T23:22:06+5:302016-05-31T23:22:06+5:30

जळगाव : विविध आरोपांमुळे चौकशीच्या फेर्‍यात असलेले महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना पाठीचा त्रास होत असल्याने त्यांनी शासकीय लाल दिव्याच्या वाहनाऐवजी खाजगी वाहनाने मुक्ताईनगरपर्यंत प्रवास करणे पसंत केले. मात्र शासकीय वाहनाच्या ए.सी.च्या कॉम्प्रेसरमध्ये बिघाड असल्याची माहिती समोर येत आहे.

Due to back problems due to back problems, red light was not used by private cars: talk of failure of government car | पाठीच्या त्रासामुळे खडसेंकडून खाजगी कारचा वापर लाल दिवा टाळला : शासकीय कारमध्ये बिघाडाची चर्चा

पाठीच्या त्रासामुळे खडसेंकडून खाजगी कारचा वापर लाल दिवा टाळला : शासकीय कारमध्ये बिघाडाची चर्चा

Next
गाव : विविध आरोपांमुळे चौकशीच्या फेर्‍यात असलेले महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना पाठीचा त्रास होत असल्याने त्यांनी शासकीय लाल दिव्याच्या वाहनाऐवजी खाजगी वाहनाने मुक्ताईनगरपर्यंत प्रवास करणे पसंत केले. मात्र शासकीय वाहनाच्या ए.सी.च्या कॉम्प्रेसरमध्ये बिघाड असल्याची माहिती समोर येत आहे.
महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे मुंबईवरून मंगळवारी सकाळी सात वाजता भुसावळ येथे आगमन झाले. त्यावेळी सकाळी रेल्वेस्थानकावर लाल दिव्याचे शासकीय वाहन दाखल झाले. मात्र या कारमधील ए.सी.च्या कॉम्प्रेसरमध्ये बिघाड आढळून आला. त्यातच खडसे यांना पाठीचा त्रास होत असल्याने त्यांनी शासकीय वाहनाने प्रवास टाळत खाजगी वाहन मागविले. मात्र या वाहनाची आरटीओ कार्यालयात नोंदणी झालेली नसल्याने त्या वाहनावर लाल दिवा लावण्यात आला नाही. खडसे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि त्यातच मंगळवारी खाजगी वाहनाने केलेला प्रवास यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात होते.

जिल्हा प्रशासनातर्फे पालकमंत्री यांना मुक्ताईनगर येथे जाण्यासाठी लाल दिव्याच्या शासकीय वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांनी खाजगी कारचा वापर केला. शासकीय वाहनात बिघाड झाल्याची कुणीही तक्रार केली नाही.
राहुल मुंडके, निवासी उपजिल्हाधिकारी.

Web Title: Due to back problems due to back problems, red light was not used by private cars: talk of failure of government car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.