नोटबंदीमुळे बँकांत ठेवींचा महापूर, दीड लाख कोटींच्या ठेवी जमा
By admin | Published: November 14, 2016 05:06 PM2016-11-14T17:06:29+5:302016-11-14T17:06:29+5:30
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याने गेल्या चार दिवसांपसून बँकांमध्ये ठेवींचा महापूर आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याने या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच बँक खात्यात जमा करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपसून बँकांमध्ये ठेवींचा महापूर आला आहे. या कालावधीमध्ये बँकांच्या खात्यांमध्ये सुमारे दीड लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.
विविध खाजगी बँकांबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या खात्यातही मोठ्या प्रमाणात रोख जमा झाली आहे. गेल्या चार दिवसांत 75 हजार 945 कोटी रुपये एसबीआयच्या खात्यात जमा झाली आहे. यादरम्यान, सुमारे तीन हजार 753 कोटी रुपयांच्या नोटा लोकांनी बदलून घेतल्या आहेत. तसेच रविवारपर्यंत सात हजार 705 रुपये लोकांनी खात्यातून काढले आहेत.
दरम्यान, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआय या बँकांनी एटीएममध्ये नव्या नोटांसाठी अनुरूप असे बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या चाचण्या झाल्यानंतर या बँकांच्या एटीएममधून 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध केल्या जातील.