BSF च्या धास्तीने पाकिस्तानने सीमेवरुन रेंजर्सना हटवले
By admin | Published: November 5, 2016 09:04 AM2016-11-05T09:04:23+5:302016-11-05T09:04:23+5:30
मागच्या काही दिवसात वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला भारताच्या बीएसएफने सडेतोड प्रत्युत्तर दिल्यामुळे पाकिस्तानने...
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ५ - मागच्या काही दिवसात वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला भारताच्या बीएसएफने सडेतोड प्रत्युत्तर दिल्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवरुन रेंजर्सना हटवून त्यांच्याजागी लष्कराच्या विशेष सैनिकांची नियुक्ती केली आहे. जम्मूला लागून असलेल्या १९० किमीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्करातील विशेष सैनिकांची तैनाती सुरु आहे.
पाकिस्तानला लागून असलेली नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफला नेहमी पाकिस्तानी रेंजर्सशी दोन हात करावे लागतात. पण आता रेजर्सच्या पोस्टवर पाकिस्तानी सैनिकांची तैनाती करण्यात आल्याची माहिती बीएसएफ आणि सरकारमधील सूत्रांनी दिली. सीमेवर पाकिस्तानच्या बाजूला मोठया प्रमाणावर हालचाली सुरु आहेत.
रोजच्या रोज या भागात मोठया प्रमाणावर गाडयांची वाहतूक सुरु आहे. सैनिक आणि शस्त्रास्त्रांनी भरलेल्या गाडया इथे येत आहेत असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानच्या या हालचालींमुळे येणा-या दिवसांमध्ये सीमेवरील तणाव आणखी वाढणार हे निश्चित आहे.