इंटकच्या संपाने बसेसचा चक्काजाम ९२७ फेर्या रद्द : सुमारे ७ लाखाचे नुकसान
By admin | Published: December 18, 2015 12:29 AM2015-12-18T00:29:13+5:302015-12-18T00:29:13+5:30
जळगाव : महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) संघटनेने २५ टक्के पगार वाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जळगाव आगाराच्या ९२७ फेर्या रद्द करण्यात आल्याने सुमारे ७ लाख रूपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे. संपामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सामान्य जनता, विद्यार्थी व प्रवाशांचे मात्र हाल झालेत.
Next
ज गाव : महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) संघटनेने २५ टक्के पगार वाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जळगाव आगाराच्या ९२७ फेर्या रद्द करण्यात आल्याने सुमारे ७ लाख रूपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे. संपामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सामान्य जनता, विद्यार्थी व प्रवाशांचे मात्र हाल झालेत.जो पर्यंत शासन २५ टक्के पगारवाढ करत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा पवित्रा घेत इटकचे विभागीय सचिव नरेंद्रसिंह राजपूत आणि जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील यांच्या नेतृत्वात आगारात पहाटे ४ वाजेपासून कामबंद आंदोलन करण्यात आले. बसस्थानक गेटच्या मधोमध बसून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आगार दणाणून सोडले.प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हालसंपामुळे अचानक बसफेर्या रद्द झाल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांचे मात्र हाल झालेत. कित्येक प्रवाशी बाहेरील राज्यातून आल्याने त्यांना घरी जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागले. संपामुळे प्रवाशांना का वेठीस धरले गेले म्हणून आंदोलनकर्त्यांवर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. महिला प्रवाशीही घरी जाण्यासाठी चिंतेत दिसत होत्या. पहाटेच्या सुमारास काही बसफेर्या सुरू असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थी शहरात आले, मात्र ११ वाजेपासून सर्वच बसफे र्या बंद झाल्याने घरी परत कसे जायायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. विद्यार्थ्यांकडे पासेस असल्याने पैसे नव्हते, म्हणून त्यांना खाजगी वाहतूकीनेदेखील घरी जाता येत नव्हते. एकंदरीत स्थानकात प्रवाशी व विद्यार्थ्यांच्या गर्दीने यात्रेचे स्वरूप आले होते. बसेसच्या चाकांची काढली हवाविद्यार्थ्यांचे हाल होेऊ नये म्हणून दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर बस (एम.एच.२०, बी.एल.३३५९) एका चालकाने स्थानकाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता आंदोलनकर्त्यांनी बस अडवून थांबविली व चालकास संपामुळे कामबंद असल्याचा दम दिला. दोघात वादावाद झाल्याने गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली. तेवढ्यात गर्दीचा फायदा घेत एका आंदोलनकर्त्याने सदर बसच्या चाकाची हवा काढली. विद्यार्थ्यांनीही यावेळी गोंधळ केल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यामुळे पळापळ सुरू झाली होती. कोट-पुणे येथे कर्तव्यास असून नोकरीच्या कामानिमित्त डेहराडूनला गेलो होतो. एवढ्या लांबून वापस आल्याने बसेस बंदमुळे खुप त्रास होत आहे. विनाकारण प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. गावाला खाजगी वाहने जात नसल्याने घरी कसे जायायचे हा प्रश्न आहे. -विजय पाटील, प्रवासी, तळई, ता.एरंडोलबातमी अपूर्ण........