ड्युटीवर जाणार्या सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू महामार्गावर झाला अपघात : वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न
By Admin | Published: March 4, 2016 10:37 PM2016-03-04T22:37:14+5:302016-03-05T00:55:46+5:30
दहा दिवसाची सुी संपल्यानंतर आसाम येथे ड्युटीवर जाणार्या राकेश सुभाष पाटील-पवार या जवानाचा शुक्रवारी दुपारी अडीच वाजता नशिराबाद नजीक ट्रक-दुचाकी अपघातात मृत्यू झाला,
नशिराबाद : दहा दिवसाची सुी संपल्यानंतर आसाम येथे ड्युटीवर जाणार्या राकेश सुभाष पाटील-पवार (वय २५ रा.मुडी मांडळ, ता.अमळनेर)या जवानाचा शुक्रवारी दुपारी अडीच वाजता नशिराबाद नजीक गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाजवळ ट्रक-दुचाकी अपघातात मृत्यू झाला, तर पत्नी नंदीनी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राकेश हा आसाम येथे ड्युटीला होता. दहा दिवसापूर्वीच तो सुीवर घरी आला होता. ही सुी संपल्यानंतर आसामला जाण्यासाठी भुसावळ येथून रेल्वे असल्याने सकाळी दहा वाजता मुडी मांडळ येथून दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.डब्लु.८६३६) पत्नीला सोबत घेऊन भुसावळकडे निघाला. दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान आयशर ट्रक (क्र.एम.एच.०५ के.९९०६) व दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात राकेश याच्या डोक्यातील कवटीच बाहेर आली, त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला तर पत्नी नंदीनी यांनाही जबर मार लागल्याने त्याही गंभीर अवस्थेत आहेत. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सार्थक नेहते व त्यांच्या सहकार्यांनी नंदीनी यांना गोदावरी रुग्णालयात दाखल करून राकेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.
वडील गेले होते बसने
राकेश व त्याची पत्नी दुचाकीने तर त्याचे वडील सुभाष सुकलाल पाटील हे बसने भुसावळला गेले होते. मुलाला सोडण्यासाठी ते भुसावळपर्यंत आले होते, मुलगा भुसावळला न पोहचताच त्याच्या मृत्यूचाच निरोप त्यांना मिळाला. दरम्यान, राकेश याचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. तो एकुलता एक मुलगा होता. बहिणीचे लग्न झालेले आहे. आई-वडिलांनी मजुरी करून त्याला वाढविले. घरची परिस्थिती जेमतेमच होती. तो नोकरीला लागल्याने आता कुटुंबाला चांगले दिवस आले होते. पाच वर्षापूर्वी तो सीआरपीएफमध्ये भरती झाला होता.
जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
राकेशच्या अपघाताचे वृत्त समजताच त्याच्या अमळनेर, जळगाव व पारोळा तालुक्यातील नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. हिसाळे ता.शिरपूर येथील त्याची सासुरवाडी आहे.