वाघूर धरणात बुडून बालकाचा मृत्यू हिंगणे बुद्रूकची घटना : पोहताना घडली दुर्घटना
By admin | Published: April 1, 2016 12:38 AM2016-04-01T00:38:23+5:302016-04-01T00:38:23+5:30
जळगाव : वाघूर धरणात पोहोचण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हिंगणे बुद्रूक, ता.जामनेर येथे घडली.
Next
ज गाव : वाघूर धरणात पोहोचण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हिंगणे बुद्रूक, ता.जामनेर येथे घडली. हिंगणे बुद्रूक येथील रहिवासी मंगेश लक्ष्मण धोटे (वय १२) हा बालक गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावाशेजारी असणार्या वाघूर धरणाच्या पाण्यात सहकारी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला होता. धरणाच्या काठावर पोहत असताना मंगेश आतमध्ये गेला. त्या ठिकाणी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब पाहून त्याचे मित्र घाबरून गेले. त्यांनी आरडाओरड केली; परंतु जवळपास कुणीही मोठी व्यक्ती नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या काही मित्रांनी गावात येऊन ही बाब लोकांना सांगितल्यावर धरणावर गर्दी झाली. पोहणार्या तरुणांनी मंगेशला पाण्याबाहेर काढले. नंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे त्याला दुपारी तीन वाजेच्या सुमारास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.धोटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरया घटनेमुळे धोटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. जिल्हा रुग्णालयात त्याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. मयत मंगेशचे वडील लक्ष्मण धोटे हे शेतीचा व्यवसाय करतात. ते एका हाताने अपंग आहेत. मंगेश हा गावातील जि.प. शाळेत इयत्ता सातवीत शिकत होता. त्याला एक मोठा भाऊ व बहीण आहे. तो घरात सर्वात लहान असल्याने सर्वांचा लाडका होता. मंगेश मनमिळावू स्वभावाचा होता. तो अभ्यासातही हुशार होता. त्याचे आकस्मिक जाणे सर्वांना चटका लावून गेले, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात व्यक्त केल्या.