राज्यात २५ लाख गाठींनी घटले उत्पादन कपाशीवर परिणाम : सरकीमधील तेजीने भाववाढ

By admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:52+5:302016-02-02T00:15:52+5:30

सेंट्रलडेस्कसाठी

Due to the decrease in production of 25 lakh bales in the state, the increase in prices has increased | राज्यात २५ लाख गाठींनी घटले उत्पादन कपाशीवर परिणाम : सरकीमधील तेजीने भाववाढ

राज्यात २५ लाख गाठींनी घटले उत्पादन कपाशीवर परिणाम : सरकीमधील तेजीने भाववाढ

Next
ंट्रलडेस्कसाठी
चंद्रकांतजाधव/जळगाव- देशात १५ लाख तर राज्यात तब्बल २५ लाख गाठींनी कापसाचे उत्पादन घटले आहे. यासंदर्भात येत्या ५ रोजी कापूस सल्लागार मंडळाच्या (सीएबी) मुंबई येथे आयोजित बैठकीत चर्चा होणार असून, उत्पादनातील घटीच्या दृष्टीने पुढील नियोजन होईल.

देशात यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सहा लाख हेक्टरने कपाशीच्या लागवडीत घट झाली होती. तर अखेरपर्यंत ३६५ लाख गाठींचे उत्पादन आले होते. यंदा ११९ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. त्यातून ३५० लाख गाठींचे उत्पादन आले. याचा अर्थ देशात १५ लाख गाठींचे उत्पादन घटले आहे.

राज्यात मागील वर्षी ४१.७१ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. तर ८५ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यंदा ३९.७२ लाख हेक्टरवर लागवड झाली आणि त्यातून आतापर्यंत ६० लाख गाठींचे उत्पादन आले आहे. या वृत्तास राज्याच्या सूतगिरणी कार्यकारी संचालक असोसिएशनचे सदस्य आर.डी.पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
खोडवा खराब झाला...
राज्यात विदर्भासह खान्देशात कपाशीचा खोडवा (फरदड) घेतला जातो. पण खोडवा तुडतुडे, चिकटा व इतर समस्यांमुळे खराब झाला. कृत्रीम जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतकर्‍यांनी कपाशीचे पीक काढून रब्बी पिकांच्या पेरणीस पसंती दिली. यामुळे पुढे कपाशीचे उत्पादन वाढेल ही आशा धूसर झाली आहे.
सरकी तेजीत
कपाशीला भाव बर्‍यापैकी आहे. सरकी तेजीत असल्याने भाव बरे आहेत. मागील वर्षी सरकीला १७०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. यंदा २२०० रुपयांपर्यंत भाव आहे. तर खंडीला (३५६ किलो रुई) कमाल ३४००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
सीएबीचा अंदाज ठरला खरा
कापूस सल्लागार मंडळाने सुरुवातीलाच देशात ३५१ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. उत्पादनातील घट झालेली असली तरी देशांतर्गत बाजारात गाठींचा उठावही कमी आहे. यामुळेे उत्पादनातील घटीला सूतगिरण्या, कापड मील्सवर परिणाम होणार नाही.

कोट-
सरकीमुळे कपाशीला भाव आहे. पुढेे आणखी वाढू शकतात. पण जागतिक बाजारात सूताच्या कापडाला फारशी मागणी नाही. यामुळे खंडीचे किंवा रुईचे भाव कमी आहेत.
-अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

इन्फो-
देशातील गाठींचे उत्पादन व निर्यातीची माहिती
(आकडे लाख गाठींमध्ये)
वर्षउत्पादननिर्यात
२००५-०६१८५२८
२००६-०७२२६३१
२००७-०८२५९८५
२००८-०९२९५६५
२००९-१०३४३५५
२०१०-११३६५७५
२०११-१२३५३१२८
२०१२-१३३८०११४
२०१३-१४३६०११२
२०१४-१५३८३५५
२०१५-१६३५० ५२

Web Title: Due to the decrease in production of 25 lakh bales in the state, the increase in prices has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.