दुष्काळामुळे ग्रामीण भागात वस्तूंचा खप घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2016 02:25 AM2016-03-19T02:25:02+5:302016-03-19T02:25:02+5:30

गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस, त्यातही दोन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागावर झाला असून वस्तूंचा खप कमालीचा घटला आहे.

Due to drought, the consumption of commodities in rural areas decreased | दुष्काळामुळे ग्रामीण भागात वस्तूंचा खप घटला

दुष्काळामुळे ग्रामीण भागात वस्तूंचा खप घटला

Next

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस, त्यातही दोन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागावर झाला असून वस्तूंचा खप कमालीचा घटला आहे. शेतकऱ्यांसोबतच एफएमसीजी आणि फूड सेक्टरवर त्याचा थेट परिणाम झाला आहे.
१२ व्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या चार वर्षांत देशाच्या कृषी विभागाचा विकासाचा दर अवघा १.६ टक्के राहिला. खरे तर हे लक्ष्य ४ टक्के होते. पाऊस कमी पडत असल्याने कृषी क्षेत्रात ही घसरण झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
कमी पावसामुळे कपाशी, सोयाबीन, ऊस आणि आंबा यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आंबा हे महत्त्वाचे पीक आहे. दुष्काळामुळे दोन्ही राज्यांत यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कृष्णा जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन केवळ ५० टक्के होण्याची शक्यता असल्याचे कृष्णा जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या सहायक संचालक एन. सुजाता यांनी सांगितले.
पाऊस कमी झाल्याने उसाची लागवड कमी होऊन उत्पादनही घटले. त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर झाला. परिणामत: ऊसतोड कामगार लवकर घरी परतले आणि कारखान्यांचे गाळपही लवकर बंद झाले. दुष्काळग्रस्त भागात आम्हाला आर्थिक वृद्धी दिसत नाही. ग्राहक स्वस्त तेलाकडे वळले आहेत. त्यामुळे चांगल्या तेलाची विक्री घटली आहे.

गारपीट, अवकाळीने १.३ कोटी टन गव्हाचे नुकसान
अवकाळी पावसासोबत गारपिटीने १.३ कोटी टन गव्हाचे नुकसान होण्याचा अंदाज एका अभ्यासात वर्तविण्यात आला आहे. कदाचित गव्हाची आयात करावी लागेल.
असोचेमने याबाबतचा अहवाल जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, उत्पादनात घट झाल्याने चलनवाढ होऊ शकते. असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले की, गव्हावरील आयात शुल्क घटवून १० टक्क्यांवरून पाच टक्के करण्याची गरज आहे. तसे झाल्यास खासगी व्यापारी गव्हाची समांतर आयात करतील आणि गहू सहज उपलब्ध होईल, त्यामुळे स्टॉक आणि किमतीवरील दडपणही कमी होईल.
९.३ कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण त्यात आता १.३ कोटी टन घट होण्याची शक्यता आहे. सरकारला गव्हाची आयात करण्याचाही विचार करावा लागेल.

Web Title: Due to drought, the consumption of commodities in rural areas decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.