दुष्काळाची दाहकता वाढली १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर : हतनूरचा साठा १० टक्क्यांवर

By admin | Published: May 12, 2016 10:53 PM2016-05-12T22:53:48+5:302016-05-12T22:53:48+5:30

जळगाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्‘ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्‘ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०.५ टक्क्यांवर आला आहे.

Due to the drought, the increase of 12 9 villages has been declared drought: Hathnur stock is 10% | दुष्काळाची दाहकता वाढली १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर : हतनूरचा साठा १० टक्क्यांवर

दुष्काळाची दाहकता वाढली १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर : हतनूरचा साठा १० टक्क्यांवर

Next
गाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्‘ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्‘ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०.५ टक्क्यांवर आला आहे.
मराठवाडा व विदर्भातील हजारो गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असताना शासनाने दुष्काळ जाहीर का केला नाही, अशी कानउघाडणी उच्च न्यायालयाने केल्यानंतर महसूल विभागाने २९ हजार ३०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करणारा आदेश काढला आहे.
जिल्‘ातील १२९५ गावांत दुष्काळ
शासनाने दुष्काळाची घोषणा केल्यामुळे जिल्ह्यातील १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. यापूर्वी या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृष्यस्थिती असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. दुष्काळ जाहीर केल्यानंतर या गावांमध्ये शासनातर्फे कृषि पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात आली होती. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय झाला होता. यासह कापूस, मका व सोयाबिन खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये १०५ कोटींची वाटप
जिल्हा प्रशासनाने डिसेंबर महिन्यात अंतिम आणेवारी जाहीर केली. त्यात तब्बल १२९५ गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आहे. राज्य शासनातर्फे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १०५ कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप या गावांमधील शेतकर्‍यांना करण्यात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रशासनाने ९७ कोटी ७९ लाख ४७ हजार ७१२ रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना तहसीलदारांमार्फत वाटप केली होती. त्यानंतर उर्वरित रक्कमदेखील वाटप केली होती.

हतनूरचा साठा १०.५ टक्के
मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. गिरणा धरणात पाणीसाठा शून्य आहे. तर हतनूर धरणात अवघा १०.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाघूर धरणात ५३.०९ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १५.४७ टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १८.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

६१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी
जिल्ह्यातील ९०० पेक्षा जास्त गावांमध्ये पाणी टंचाई आहे. पाण्यासाठी महिला व नागरिकांना भटकंती करावी लागत असताना जिल्हा प्रशासनातर्फे ६१ गावांमध्ये ५७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १० शासकीय टँकर तर ४७ खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. २२१ गावांमधील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर ९६६ गावांमध्ये नवीन विंधनविहिर घेण्यात आल्या आहेत.

Web Title: Due to the drought, the increase of 12 9 villages has been declared drought: Hathnur stock is 10%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.