भाडेवाढ झाल्यामुळे मेट्रोचे दिवसाचे तीन लाख प्रवासी घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 05:28 PM2017-11-24T17:28:40+5:302017-11-24T17:36:22+5:30
ऑक्टोंबर महिन्यात भाडेवाढ झाल्यापासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दिवसाला सरासरी 27.4 लाख नागरिक मेट्रोने प्रवास करायचे.
नवी दिल्ली - ऑक्टोंबर महिन्यात भाडेवाढ झाल्यापासून दिल्ली मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. भाडेवाढीमुळे दिल्ली मेट्रोचे दिवसाचे तीन लाखापेक्षा जास्त प्रवासी घटले आहेत. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.
ऑक्टोंबर महिन्यात दिल्ली मेट्रोची दिवसाची सरासरी प्रवासीसंख्या 24.2 लाख होती. सप्टेंबर महिन्यात दिवसाला सरासरी 27.4 लाख नागरिक मेट्रोने प्रवास करायचे. म्हणजे महिन्याभरात तीन लाख प्रवासी कमी झाले. महिन्याभरात प्रवासी संख्येमध्ये 11 टक्के घट झाली आहे.
मेट्रोचे दिल्ली-एनसीआर भागात 218 किलोमीटरचे जाळे आहे. गुरगाव आणि उत्तर दिल्लीला जोडणा-या यलो लाईनमार्गावर 19 लाख प्रवासी घटले आहेत.