अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने मुलाने बाईकवरून नेला आईचा मृतदेह

By admin | Published: September 1, 2016 11:43 AM2016-09-01T11:43:18+5:302016-09-01T11:43:18+5:30

अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने एका मुलाला मोटारबाईकवरून त्याच्या आईचा मृतदेह घरी न्यावा लागल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली.

Due to lack of ambulance, the boy took his body from the bike to the dead body | अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने मुलाने बाईकवरून नेला आईचा मृतदेह

अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने मुलाने बाईकवरून नेला आईचा मृतदेह

Next
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १ - रुग्णालयाने गाडी देण्यास नकार दिल्याने एका आदिवासी व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन न्यावा लागल्याची ओदिशातील घटना अद्याप ताजी असतानाच आता मध्य प्रदेशमध्ये अशीच एक असंवेदनशील घटना समोर आली असून अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने एका मुलाला मोटारबाईकवरून त्याच्या आईचा मृतदेह घरी न्यावा लागल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
मध्य प्रदेशमधील सेओनी जिल्ह्यातील उमत जवळ ही घटना घडली. भीमराव हा इसम, मंगळवारी त्याच्या ७० वर्षीय आजारी आईला (पार्वती बाई) उपचारांसाठी बारघाट येथील रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. त्यानंतर भीमराव यांनी १०८ क्रमांकावर फोन करून अॅम्ब्युलन्स मागवली. पुढच्या १० मिनिटांत अॅम्ब्युलन्स तेथे हजर झाली मात्र चालकाने गाडीतून शव नेण्यास नकार दिला. त्यामुळे भीमराव यांना मोटरबाईकवरून त्यांच्या आईचे शव घरापर्यंत न्यावे लागले. एवढ्या दु:खाच्या प्रसंगीही त्या अॅम्ब्युल्नस ड्रायव्हरने जराही माणुसकी न दाखवल्याने एका मुलाला दुचाकीवरून त्याच्या आीचे शव न्यावे लागल्याची धक्कादायक धटना घडली. 
आम्ही याप्रकरणाची चौकशी करत असून याप्रकरणी स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. रुग्णवाहिकेच्या जिल्हा समन्वयकाने मात्र मृतदेह घेऊन जाणे हे अॅम्ब्युलन्स सेवेच्या प्रोटोकॉलमध्ये येत नसल्याचं सांगत आपल्या कृत्याचे समर्थन केले आहे.
 
आणखी वाचा : 
(अरे बापरे ! पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याने केला 10किमी प्रवास)
(मध्य प्रदेशात असंवेदनशीलतेचा कळस, पत्नीच्या मृतदेहासह बसमधून खाली उतरवले)
(रुग्णालयाने प्रवेश नाकारला, मुलाने पित्याच्या खांद्यावर सोडले प्राण)
 
 

Web Title: Due to lack of ambulance, the boy took his body from the bike to the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.