रुग्णवाहिका नसल्याने चक्क प्लास्टिक पिशवीतून नेला मृतदेह
By admin | Published: September 28, 2016 12:15 PM2016-09-28T12:15:45+5:302016-09-28T12:15:45+5:30
रुग्णवाहिका नसल्याने नातेवाईकांना चक्क प्लास्टिकच्या पिशवीतून मृतदेह घेऊन जावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
बिहार, दि. 28 - रुग्णवाहिका नसल्याने नातेवाईकांना चक्क प्लास्टिकच्या पिशवीतून मृतदेह घेऊन जावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कटीहार येथे ही घटना घडली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी भागलपूरला न्यायाचा होता. मात्र त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. डॉक्टरांनी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यास नकार दिल्यानंतर नातेवाईकांनी मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेह बांधून नेला.
'आमच्या नातेवाईकाचा 14 दिवसांपुर्वी गंगेत बुडून मृत्यू झाला होता. मृतदेह खराब होऊ लागला होता, त्यामुळे शवविच्छेदनासाठी आम्ही कटीहार रुग्णालयात घेऊन आलो हातो. सुरुवातीला डॉक्टरांनी येथेच शवविच्छेदन होणार असं सांगितलं होतं. मात्र 24 तासांनी मृतदेह भागलपूरला नेण्यास त्यांनी सांगितलं. भागलपूरला मृतदेह नेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत असं आम्ही डॉक्टरांना सांगितलं, पण त्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देऊ शकत नाही असं सांगितल,' अशी माहिती नातेवाईकाने दिली आहे.
Initially they said postmortem will be done here, but after keeping body for more than 24 hrs, doc asked us to take it to Bhagalpur-Relative pic.twitter.com/pdUht0DDQG
— ANI (@ANI_news) September 28, 2016
Told the doctors that we don't have money to take the body to Bhagalpur; they didn't provide us with an ambulance: Grandfather pic.twitter.com/GkArO2rSoc
— ANI (@ANI_news) September 28, 2016