रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्याने ढकलगाडीवरुन नेला पत्नीचा मृतदेह
By admin | Published: November 7, 2016 12:55 PM2016-11-07T12:55:56+5:302016-11-07T13:21:13+5:30
रुग्णवाहिकेसाठी पैसै नसल्याने एका व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह ढकलगाडीवरुन न्यावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 7 - रुग्णवाहिकेसाठी पैसै नसल्याने एका व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह ढकलगाडीवरुन न्यावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रामुलू असं या व्यक्तीचं नाव असून ते भीक मागतात. त्यांची पत्नी कविता आजारी होती. शुक्रवारी लिंगमपली रेल्वे स्थानकाजवळ असताना त्यांचा मृत्यू झाला. रामुलू यांना पत्नीचा मृतदेह हैदराबादला न्यायचा होता. मात्र रुग्णवाहिकेला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्यांनी ढकलगाडीवरुन पत्नीचा मृतदेह नेला.
शुक्रवारी सकाळी रामुलू यांनी हैदराबादसाठी प्रवास सुरु केला होता. तब्बल 60 किमी प्रवास केल्यानंतर शनिवारी संध्याकाळी ते विक्रमगडला पोहोचले. पण त्यांचा रस्ता चुकला होता. अखेर तेथील पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने विक्रमगडमध्येच अंत्यविधी करण्यात आला.
'पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावी तिचा अंत्यविधी करण्याचं ठरवलं. त्यांनी काही स्थानिक वाहनचालकांकडे मदत मागितली, पण त्यांनी 5 हजार रुपये मागितले. गाडी भाड्याने घेण्यासाठी पैसे नसल्याने रामुलू यांनी ढकलगाडीवर मृतदेह ठेवला आणि प्रवास सुरु केला. 60 किमी प्रवास केल्यानंतर ते शनिवारी संध्याकाळी विक्रमगडला पोहोचले', अशी माहिती पोलीस अधिकारी जी रवी यांनी दिली आहे.
कविता यांना रोग झाला होता त्यामुळे मृतदेह जास्त वेळ ठेवू शकत नव्हते. त्यामुळे विक्रमगडमध्येच नातेवाईकांशिवाय त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.