वर्गणी, कर्ज भरण्यासाठी मुख्याध्यापकांची कारकुनी शिक्षक संघटनांचा विरोध : दिवाळीला वेतन न मिळाल्याने नाराजी
By admin | Published: October 25, 2016 12:56 AM2016-10-25T00:56:59+5:302016-10-25T00:56:59+5:30
जळगाव : जिल्हाभरातील विविध पतपेढ्या, सोसायट्यांमधून आपल्या कार्यक्षेत्रातील जि.प.शाळांमधील शिक्षकांनी घेतलेले कर्ज, त्यांची वर्गणी भरण्याची कारकुनी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाला करावी लागत आहे. या मुख्याध्यापकांचा वेळ अधिकचा खर्च होत असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याला शिक्षकांनी विरोध केला असून, हे कारकुनीचे काम पूर्वीप्रमाणे पं.स.कडे सोपविले जावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.
Next
ज गाव : जिल्हाभरातील विविध पतपेढ्या, सोसायट्यांमधून आपल्या कार्यक्षेत्रातील जि.प.शाळांमधील शिक्षकांनी घेतलेले कर्ज, त्यांची वर्गणी भरण्याची कारकुनी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाला करावी लागत आहे. या मुख्याध्यापकांचा वेळ अधिकचा खर्च होत असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याला शिक्षकांनी विरोध केला असून, हे कारकुनीचे काम पूर्वीप्रमाणे पं.स.कडे सोपविले जावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. यातच सणासुदीच्या म्हणजेच दिवाळीनिमित्त याच महिन्यात शिक्षकांना वेतन देण्याचे शासनाचे आदेश असताना त्यालाही बगल दिली असून, अजूनही शिक्षकांना या महिन्याचे वेतन मिळालेले नाही. याबाबतही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतर कपात परस्परशिक्षकांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी व व्यवसाय कराची रक्कम पं.स.स्तरावरून परस्पर निकषानुसार केली जाते. सोसायट्यांचे कर्ज, वर्गणी कपातीचे काम मुख्याध्यापकालाइतर रकमांची कपात पं.स.स्तरावर केली जात असली तरी शिक्षकांचे ग.स., धुळे नंदुरबार सरकारी नोकरांची बँक, पारोळा शिक्षक पतपेढी, भुसावळ नूतन प्राथमिक शिक्षकांची पतपेढी या सोसायट्यांतर्फे घेतलेल्या कर्जाचा हप्ता, त्यांची वर्गणी आदी मात्र पं.स.स्तरावरून कपात न होता त्यासंबंधीची कपात, कार्यवाही करायची जबाबदारी संबंधित शाळेतील शिक्षकांच्या मुख्याध्यापकाला दिली आहे. मुख्याध्यापक वेतन प्राप्त झाल्यावर यादी तयार करून आपल्या शाळेतील शिक्षकांचा कर्ज हप्ता, वर्गणीसंबंधीचा धनादेश तयार करतो व तो संबंधित सोसायटीमध्ये जमा करतो. त्यात मुख्याध्यापकांचा सोसायटीमध्ये चकरा माराव्या लागतात. महिला मुख्याध्यापकांना याचा अधिकचा त्रास होत आहे. नॉन सॅलरी खात्याबाबतही गोंधळसध्या शिक्षकांचे वेतन हे शालार्थ प्रणालीद्वारे होते. त्यासाठी मुख्याध्यापकांचे नॉन सॅलरी खाते अद्ययावत करायची सूचना वेतन जमा होत असलेल्या बँकांनी दिली आहे. परंतु काही शिक्षकांचे नॉन सॅलरी खाते हे व्यवहार बंद झाल्याने बंद आहेत. ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित बँकेकडून पाच हजार रुपये ठेव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतही शिक्षकांनी आक्षेप घेतले आहेत. ज्या कपाती पूर्वी पं.स.स्तरावरून होत होत्या त्या आता मुख्याध्यापकांना कराव्या लागतात. धनादेश तयार करणे, ते सोसायटीत जमा करणे व काही चूक झाल्यास तीला सामोरे जाणे. अशा समस्यांना मुख्याध्यापकांना तोंड द्यावे लागते. जे काम पं.स.स्तरावरून सहज होते ते करण्यासाठी जिल्हाभरातील १८०० मुख्याध्यापकांना वणवण करावी लागते. -विलास नेरकर, अध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक संघ