२९२ पैकी २०४ रेल्वे अपघात रेल्वे कर्मचा-यांच्या चूकीमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2016 08:24 PM2016-03-07T20:24:27+5:302016-03-07T20:24:27+5:30
मागच्या काहीवर्षात झालेल्या २९२ रेल्वे अपघातांपैकी तब्बल २०४ रेल्वे अपघात रेल्वे कर्मचा-यांच्या चूकीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - मागच्या काहीवर्षात झालेल्या २९२ रेल्वे अपघातांपैकी तब्बल २०४ रेल्वे अपघात रेल्वे कर्मचा-यांच्या चूकीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपघातांप्रकरणी आतापर्यंत ५४२ कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली असून, ५०० प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
२०१२-१३ ते जानेवारी २०१६ पर्यंत मानवरहीत क्रॉसिंगवर झालेले अपघात सोडले तर, २०४ रेल्वे अपघातांमध्ये मानवी चूक समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अनेक रेल्वे अपघातांमागे रेल्वे कर्मचा-यांचे दुर्लक्ष हे सुद्धा एक कारण आहे असे रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सर्व अपघातांची चौकशी केली जाते. त्यांच्या अहवालाच्या आधारावर दोषी आढळणा-या कर्मचा-यांवर कारवाई केली जाते असे या अधिका-याने सांगितले.