मान्सून केरळात धडकला
By admin | Published: May 31, 2017 04:51 AM2017-05-31T04:51:45+5:302017-05-31T04:51:45+5:30
मान्सूनचे केरळच्या किनाऱ्यावर मंगळवारी आगमन झाले असून, राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, बीड व ठाणे जिल्ह्याच्या
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मान्सूनचे केरळच्या किनाऱ्यावर मंगळवारी आगमन झाले असून, राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, बीड व ठाणे जिल्ह्याच्या काही भागांत आज मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वरमध्येही मुसळधार पाऊ स पडला.
मान्सून ईशान्येकडील राज्यांतही धडकला असून, याचे श्रेय मोरा वादळाला आहे. मान्सून केरळात १ जूनला येतो. मान्सूनची उत्तरेकडील मर्यादा सध्या कोची, तोंडी, ऐझवाल, कोहिमा आणि देवमाळी येथून जात आहे. येत्या २४ तासांत मोरा वादळामुळे ईशान्येच्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल व तो त्यानंतर कमी होईल.