दुष्काळाच्या बातमीचा जोड़़़़़
By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:13+5:302015-08-18T21:37:13+5:30
जिल्ात ४१२ टँकरने पाणीपुरवठा
Next
ज ल्ह्यात ४१२ टँकरने पाणीपुरवठा मागीलवर्षी जिल्ह्यात ३६९ टँकरव्दारे २८५ गावे व १ हजार २१७ वाड्या वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता़ वर्षभरात ऑक्टोबर वगळता ११ महिने टँकर सुरू असून, यंदा टँकरची संख्या ४१२ वर पोहोचली आहे़ जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर आणि राहुरी वगळता ११ तालुक्यांत टँकर सुरू असून, ६ लाख ८६ हजार ३८७ नागरिक टँकरचे पाणी पितात़ टँकर कुठे कितीसंगमनेर-२६, कोपरगाव-१, नेवासे-१९, राहाता-१, नगर-३४, पारनेर-६७, पाथर्डी-८५, शेवगाव-४६,कर्जत-५४, जामखेड-३५, श्रीगोंदा-२०, कर्जत नगरपंचायत-१२ ़़़़दक्षिण नगर जिल्ह्यात भीषण टंचाई दक्षिण नगर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ दक्षिणेतील कर्जत, पारनेर, जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यात एकूण १९७ टँकर सुरू आहेत़ या परिसरात टँकर भरण्यासाठीदेखील पाणी शिल्लक नव्हते़ त्यामुळे कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले आहे़ त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागला आहे़़़़़़२ लाख ६१ हजार हेक्टरवरील खरीप धोक्यात जिल्ह्यात गतवर्षी खरिपाची १७ टक्के पेरणी झाली होती़ यंदा खरिपाच्या पेरणीत कमालीची वाढ झाली असून, ६३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे़ जिल्ह्यात मूग, उडीद, बाजरी, तूर, कापूस, मका, कांदा आणि ऊस, यासारखी पिके आहेत़ एकूण २ लाख ६१ हजार ८०३ हेक्टरवर पिकांची पेरणी करण्यात आली आहे़ जूनमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला़ पेरणी योग्य पाऊस झाल्याने पेरणी वाढली झाली खरी, पण गेल्या दोन महिन्यात पाऊस पडला नाही त्यामुळे खरिपाचे पीक धोक्यात आले आहे़ कुठे किती पेरणी (टक्केवारीत)नगर-८३़ २९, पारनेर-४५़९, श्रीगोंदा-१२०़ ३५, कर्जत-९२़९१, जामखेड-१२९़८१, शेवगाव-५१़०१, पाथर्डी-५०़३२, नेवासे-७४़८८, राहुरी-५१़७,संगमनेर-६२़५१, अकोले-५८़२४,कोपरगाव-३५़६२, श्रीामपूर-३६़ ७६, रहाता-८६़ ८६़़़़़ अवकाळी पावसाचा तडाखागेल्या फेबु्रवारी ते मार्च या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावली़या पावसामुळे ८९ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली़ आधीच दुष्काळ त्यात पाऊस पडल्याने पिके वाया गेली़ जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने पिके वाया गेली आहेत़ ़़़़़टँकरची स्थिती२००२ ते २०१५२००२-१३१, ०३-३७७, ०४- ६१९, ०५- १९२, ०६-२२३, ०७-४८, ०८-१२९, ०९-८८, १०-५२, ११-२२, १३-७०७, १२-२८९, १४-३६९, १५-४१२