धोनी आणि आम्रपाली ग्रुपची पार्टनरशिप संपुष्टात
By admin | Published: April 16, 2016 09:48 AM2016-04-16T09:48:18+5:302016-04-16T09:57:21+5:30
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रिअल इस्टेट फर्म आम्रपाली ग्रुपची पार्टनरशिप अखेर संपुष्टात आली असून धोनीने कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडर पदाचा राजीनामा दिला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रिअल इस्टेट फर्म आम्रपाली ग्रुपची पार्टनरशिप अखेर संपुष्टात आली असून धोनीने कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडर पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे धोनी आम्रपाली ग्रुपच्या जाहिराती करताना दिसणार नाही.
शेकडो नागरिकांनी आम्रपाली ग्रुपच्या नोएडा येथील प्रोजेक्टमध्ये घरं घेतली असून ते तेथे शिफ्टही झाले आहेत. मात्र असं असतानाही अद्याप ब-याच ठिकाणचे इलेक्ट्रिकल व इतर काम पूर्ण झाले नसून रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून नागरिकांनी सोशल मीडियावर या ग्रुपविरोधात मोहिम उघडून त्यात धोनीलाही टॅग केले होते. धोनीने आम्हाला आमची घरं मिळवून द्यावी अथवा या ग्रुपपासून स्वत:ला वेगळे करावे अशी मागणी नागरिकांनी सोशल मीडियावर केली होती.
यानंतर अखेर काल धोनीने गेल्या ६ वर्षांपासून आम्रपाली ग्रुपशी असलेले नातं संपवत ब्रँड अँम्बेसेडरपदाचा राजीनामा दिला.