पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे संताप
By admin | Published: March 18, 2016 02:01 AM2016-03-18T02:01:19+5:302016-03-18T04:15:23+5:30
पेट्रोलच्या दरात नोव्हेंबरपासून ४. 0२ रुपये आणि डिझेलच्या दरात ६.९७ रुपये वाढ झाल्याने देशभरात संताप आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढताच भाजपचे
नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात नोव्हेंबरपासून ४. 0२ रुपये आणि डिझेलच्या दरात ६.९७ रुपये वाढ झाल्याने देशभरात संताप आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढताच भाजपचे नेते जोरदार टीका सुरू करीत. डॉ. मनमोहन सिंग सरकारवर दरवाढीचे खापर फोडत.आता मात्र दरवाढीवर भाजपा नेते मूग गिळून गप्प आहेत.
केंद्रामध्ये यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती प्रति गॅलन १२0 डॉलर्सवर गेल्या होत्या. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत होते. त्याबद्दल भाजपचे सर्वच नेते यूपीए सरकारला दोषी धरत होते. आजच्या घडीला जागतिक बाजारपेठेत तेलाचे भाव ४0 डॉलर्सच्या खाली आले आहेत. त्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलचे दर खाली येणे अपेक्षित होते. पण तसे न होता सतत दरवाढ सुरू असून, त्यामुळे सामान्यांमध्ये संताप आहे.
डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक लवकरच आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
सर्व राज्यांच्या परिवहन मंडळाच्या (स्टेट ट्रान्सपोर्ट-एसटी) बसेस डिझेलवर धावतात. खासगी बसेसही डिझेलवर चालतात. त्यामुळे सर्व देशभर प्रवासी भाडे उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात महागणार
आहे.
मालवाहतूक करणारे ट्रक, टेम्पो हेही डिझेलवरच चालत असून, मालवाहतूकदारही आपले दर वाढवण्याच्या तयारीत असून, महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाचा तोटा वाढतच चालला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भाजप नेत्यांनी वेळोवेळी केलेले ट्विट पुढीलप्रमाणे...
नरेंद्र मोदी : (२३ मे २0१२ रोजी दरवाढ झाली, तेव्हा) हे काँग्रेस आणि यूपीए सरकारचे अपयश असून, यामुळे गुजरातच्या जनतेवर आर्थिक बोजा पडणार आहे.
स्मृती इराणी : (१५ जानेवारी २0११ रोजी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, तेव्हा) जनतेच्या संतापाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे.
लोकांच्या भावनांचा अंत पाहत आहे.
सुषमा स्वराज : ( ३ नोव्हेंबर २0११ रोजी पेट्रोल व डिझेलची भाववाढ झाल्यावर ) डॉ. मनमोहन सिंग सरकार सामान्यांच्या समस्यांविषयी असंवेदनशील आहे.
स्मृती इराणी : (१६ नोव्हेेंबर २0११ रोजीच्या दरवाढीविषयी) केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा हा परिणाम आहे.
आता नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी हे तिन्ही नेते केंद्रात सत्तेवर असूनही दरवाढ होणे ही जनतेची फसवणूक असल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे.