धरणगावात धार्मिक भावना दुखावल्याने दोन गटांत वाद ---------------------
By admin | Published: June 29, 2015 12:38 AM2015-06-29T00:38:26+5:302015-06-29T00:38:26+5:30
धरणगाव (जि. जळगाव) : अधिक मासानिमित्त पहाटे निघालेल्या दिंडीचे स्वागत करण्यासाठी लावलेल्या पणत्यांना काहींनी लाथा मारून त्या उधळल्याने शहरात दोन गटांत वाद झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Next
ध णगाव (जि. जळगाव) : अधिक मासानिमित्त पहाटे निघालेल्या दिंडीचे स्वागत करण्यासाठी लावलेल्या पणत्यांना काहींनी लाथा मारून त्या उधळल्याने शहरात दोन गटांत वाद झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.पोलीस व राजकीय पदाधिकार्यांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला होता. मात्र त्यानंतर बसस्टँड परिसरात संतप्त जमावाने विविध वस्तू आणि फळांची विक्री करणार्यांच्या हातगाड्या उलटविल्याने गावात दंगलीची अफवा पसरली होती. दोन्ही गटांनी परस्पराविरोधी फिर्यादी दिल्याने गुन्हे दाखल झाले आहेत.रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दिंडीच्या स्वागतासाठी पाताळनगरी भागात गृहिणींनी रांगोळ्या काढून पणत्या लावल्या होत्या. काही समाजकंटकांनी पणत्या लाथाडल्या. गावात प्रकरणाची माहिती मिळताच काही वेळातच तणाव निर्माण झाला. त्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास बसस्टँड परिसरात संतप्त जमावाने फळविक्री करणार्यांच्या हातगाड्या उलथवून टाकल्या. या घटनेमुळे गावात दंगलीची अफवा पसरली. मात्र पोलीस निरीक्षक चंद्रकांत बनगर, आ. गुलाबराव पाटील, सलीम पटेल आदींनी मध्यस्थी करून वाद मिटवला. (वार्ताहर)-----------------