वाळू व्यवसायामुळेच बापानंतर मुलाचाही मृत्यू
By admin | Published: December 29, 2015 11:51 PM2015-12-29T23:51:56+5:302015-12-29T23:51:56+5:30
जळगाव- वाळू व्यवसायात मजूर म्हणून काम करतानाच खेडी खुर्द येथील अपघातात मयत झालेल्या गोपालचे वडील संतोष नन्नवरे यांचाही १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ही वाळू अशी किती कुटुंब उद्ध्वस्त करील, असा संतापजनक सवाल खेडी खुर्द वासीयांनी उपस्थित केला आहे.
Next
ज गाव- वाळू व्यवसायात मजूर म्हणून काम करतानाच खेडी खुर्द येथील अपघातात मयत झालेल्या गोपालचे वडील संतोष नन्नवरे यांचाही १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ही वाळू अशी किती कुटुंब उद्ध्वस्त करील, असा संतापजनक सवाल खेडी खुर्द वासीयांनी उपस्थित केला आहे. मयत गोपालचेे वडीलही वाळू भरण्याचे काम करायचे. त्या वेळेस मजुरी कमी होती. पण आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांना हे अवजड काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. १५ वर्षांपूर्वी म्हणजेच गोपाल हा सात वर्षांचा असताना संतोष नन्नवरे हे खेडी खुर्दनजीकच्या गिरणा नदीत वाळू भरण्यासाठी गेले होते. वाळू वाहतुकीमुळे नदीत खोल खड्डे पडले होते. या खड्ड्यात काम करताना संतोष यांच्या अंगावर वाळूचा ढिगारा पडला होता. त्यात संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता गोपालचाही वाळूमुळे मृत्यू झाला. घरात एकटा, तीन बहिणी, पत्नी गर्भवतीमयत गोपालचे लग्न एप्रिल २०१५ मध्ये झाले होते. त्याची पत्नी गर्भवती आहे. तो घरात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, तीन बहिणी, पत्नी असा परिवार आहे. एका बहिणीचे लग्न झालेे आहे. शिकण्याच्या वयातच त्याने कुटुंबासाठी रोजगार पत्करला. गोपालचा मृत्यू झाल्याने त्यांच्या घराचा मोठा आधार हरपला आहे.