रिक्षातून धूर निघाल्याने जीव वाचविण्यासाठी विद्यार्थिनीने घेतली उडी महामार्गावर ट्रक खाली चिरडून ठार : डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरेपी कॉलेजची विद्यार्थिनी; वाशिमची रहिवासी; इतर
By admin | Published: December 18, 2015 12:28 AM2015-12-18T00:28:58+5:302015-12-18T00:28:58+5:30
सेंट्रल डेस्क व हॅलो ग्रामीणसाठी
Next
स ंट्रल डेस्क व हॅलो ग्रामीणसाठीजळगाव : धावत्या रिक्षामधून अचानक धूर निघू लागल्याने घाबरलेल्याअश्विनी राजू पाटील (२१, रा. मंगरुळपीर, जि. वाशिम) या विद्यार्थिनीने उडी घेतल्याने राष्ट्रीय महामार्गावरील ट्रक खाली येऊन ती जागीच ठार झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेसात वाजता गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय ते जळगाव दरम्यान हातेड नाल्याजवळ झाला. अपघातानंतर ट्रक व रिक्षा दोन्हीही पसार झाले. इतर प्रवाशांनीही रिक्षातून उडी घेतली मात्र ते सुदैवाने बचावले.फिजीओथेरपीच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी १. अश्विनी पाटील ही डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असून ती या महाविद्यालयाच्याच वस्तीगृहात राहत होती. गुरुवारी गावाकडे जाण्यासाठी ती एका रिक्षाने जळगावला यायला निघाली. २. रिक्षा पुढे आल्यानंतर त्यामधून अचानक धूर निघू लागला. रिक्षाला आग लागली की काय? या भीतीने प्रवाशांनी खाली उड्या घेतल्या. यामध्ये अश्विनीनेदेखील उडी घेतली. ३. चालकाच्या बाजूने उडी घेतल्याने मागून येणार्या ट्रक खाली ती आली. यात तिच्या चेहर्यावरुन ट्रकचे चाक गेले व ती जागीच गतप्राण झाली. शरीराला कोठेही इजा झालेली नसून चेहराच पूर्णपणे चेंदामेंदा झाला. ट्रक, रिक्षा पसारअपघातानंतर रिक्षाचालक, ट्रकचालक पसार झाले. इतकेच नव्हे ज्या प्रवाशांनी रिक्षातून उडी घेतली तेही प्रवासी तेथून निघून गेले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.