कार सोडून गप्पा मारणे पडले महागात बॅँकेपासून पाळत ठेवल्याचा संशय : वाहने पंˆर करुन रोकड लांबविण्याचा नवा ट्रेंड, चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना

By admin | Published: July 18, 2016 11:32 PM2016-07-18T23:32:41+5:302016-07-18T23:32:41+5:30

जळगाव: कारचा पंˆर काढायला उशिर लागत असल्याने त्या काळात कारपासून काही अंतरावर ओळखीच्या व्यक्तीशी गप्पा मारणे अतुल कोठारी या व्यापार्‍याला चांगलेच महागात पडले आहे. कारमध्ये ५४ लाख रुपयाची रोकड असल्याचे गांभीर्य ओळखून कारपासून कोठारी हलले नसते तर कदाचित ही रोकड सुरक्षित राहिली असती. दरम्यान, कोठारी यांनी ज्या बॅँकेतून रोकड काढली तेथूनच त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Due to the suspension of surveillance from the bank in the market, it has to be stopped from leaving the car: new vehicles for cash withdrawal | कार सोडून गप्पा मारणे पडले महागात बॅँकेपासून पाळत ठेवल्याचा संशय : वाहने पंˆर करुन रोकड लांबविण्याचा नवा ट्रेंड, चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना

कार सोडून गप्पा मारणे पडले महागात बॅँकेपासून पाळत ठेवल्याचा संशय : वाहने पंˆर करुन रोकड लांबविण्याचा नवा ट्रेंड, चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना

Next
गाव: कारचा पंˆर काढायला उशिर लागत असल्याने त्या काळात कारपासून काही अंतरावर ओळखीच्या व्यक्तीशी गप्पा मारणे अतुल कोठारी या व्यापार्‍याला चांगलेच महागात पडले आहे. कारमध्ये ५४ लाख रुपयाची रोकड असल्याचे गांभीर्य ओळखून कारपासून कोठारी हलले नसते तर कदाचित ही रोकड सुरक्षित राहिली असती. दरम्यान, कोठारी यांनी ज्या बॅँकेतून रोकड काढली तेथूनच त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आकाशवाणी चौकाजवळ कार पंˆर झाल्याचे सांगणार्‍या दुचाकीस्वारांनीच पाळत ठेवून त्यांचा पाठलाग केल्याचा संशय आहे. अजिंठा चौकाजवळील राजेंद्र टायर्स या दुकाना शेजारी असलेल्या आयसीआयसी एटीएमसमोर कोठारी यांनी कार थांबवून दुकानदाराला पंˆर काढण्याचे सांगितले. दुसर्‍या कारचा पंˆर काढण्याचे काम सुरु असल्याने थोडा वेळ लागणार होता, त्यामुळे कोठारी हे त्यांच्या ओळखीचे तिलकराज भाकचंद भारवे व चंदन अंबोटी यांच्याशी बोलत राहिले. थोड्यावेळाने पंˆर काढणारा व्यक्ती कारजवळ आला. टायर खोलत असताना कोठारी यांना मागील सीटवर काचचे तुकडे पडलेले दिसले. मागील बाजूस जावून पाहिले तर संपूर्ण काच फुटलेला होता व सीटवरील बॅगही गायब झालेली होती.
गिरीश महाजन यांनी केला पोलीस अधीक्षकांशी संपर्क
कोठारी यांचे वडील सुरेशचंद्र किसनलाल कोठारी यांनी घटनेची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिली.त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याशी संपर्क साधला. सुपेकर वअपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घटनास्थळ व एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. तब्बल तासभर बसून त्यांनी तपासासाठी पथके रवाना केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालाही यावेळी पाचारण करण्यात आले होते. कोठारी ज्या मार्गाने आले त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले.
संशयितांना घेतले ताब्यात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार रत्नाकर झांबरे, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव, नितीन बाविस्कर, मनोज सुरवाडे, विजय पाटील व गोविंदा पाटील यांना असे गुन्हे करणारे व पोलीस रेकॉर्डवर असलेल्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार या पथकाने सहा जणांना पकडून पोलीस स्टेशनला आणले. त्यांची उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. फिर्यादींना संशयित दाखविले असता त्यांनी हे ते नसल्याचे सांगितले, मात्र त्यांचे रेकार्ड पाहता पोलिसांनी चोरटे त्यांच्या संपर्कातील आहेत का? याची चौकशी सुरुच ठेवली.

Web Title: Due to the suspension of surveillance from the bank in the market, it has to be stopped from leaving the car: new vehicles for cash withdrawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.