नातवाला घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला सासरा, म्हणाला - सूनेला घरी आणा नाही तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:54 PM2022-12-31T12:54:34+5:302022-12-31T12:55:04+5:30

Rajasthan : हे कौटुंबिक वादाचं आहे. राधेश्याम खाती यांचा मुलगा विनोदचं लग्न काही वर्षांआधी राखी नावाच्या तरूणीसोबत झालं होतं. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.

Due to domestic conflict person climbed on water tank with his 2 years old grandson in Baran | नातवाला घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला सासरा, म्हणाला - सूनेला घरी आणा नाही तर....

नातवाला घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला सासरा, म्हणाला - सूनेला घरी आणा नाही तर....

googlenewsNext

Rajasthan : राजस्थानच्या बारां येथील छबरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्ती त्याच्या 2 वर्षाच्या नातवाला घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. तेथून त्याने मागणी केली की, त्याच्या सून एका दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत आहे. जर ती घरी परत आली नाही तर तो नातवासह टाकीवरून खाली उडी घेत आत्महत्या करेल.

हे कौटुंबिक वादाचं आहे. राधेश्याम खाती यांचा मुलगा विनोदचं लग्न काही वर्षांआधी राखी नावाच्या तरूणीसोबत झालं होतं. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. पण महिला मधेच सासर सोडून पळून गेली. मग एका दुसऱ्या तरूणासोबत ती त्यांच्याच घरासमोरील एका घरात भाड्याने राहू लागली. त्यामुळे तिच्या सासरचे लोक चिंतेत आहेत. त्यांनी सूनेला फार समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ती सासरी परत आली नाही. ती अजूनही त्या तरूणासोबत राहत आहे.

टाकीवर चढलेल्या व्यक्तीने सांगितलं की, जर त्यांची सून घरी परत आली नाही तर तो नातवासह टाकीवरून खाली उडी मारेल. त्याच्या मृत्यूला फक्त त्याची सून जबाबदार असेल. व्यक्तीला टाकीवर चढल्याचे पाहून लोकांनी पोलिसांनी सूचना दिली. 

पोलीस आणि प्रशासन लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी व्यक्तीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. आधी तर व्यक्ती टाकीवरून खाली उतरण्यास तयार नव्हती. पण त्याला आश्वासन देण्यात आलं की, सूनेला समजावून ते सासरी आणतील. तेव्हा व्यक्ती खाली आली.

Web Title: Due to domestic conflict person climbed on water tank with his 2 years old grandson in Baran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.